शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
4
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
5
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
6
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
7
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
8
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
9
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
10
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
11
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
12
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
13
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
14
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
15
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
16
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
17
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
18
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
19
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
20
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
Daily Top 2Weekly Top 5

उन्हामुळे शरीराचं तापमान वाढलं? हे खास पेय पिऊन शरीर करा गारेगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 15:02 IST

Torani Benefits: हा उपाय तुम्हाला भीषण गरमीपासून वाचवू शकतो. आज याच सुपरफूडबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. याचे फायदे काय आणि ते कसं करावं हेही सांगणार आहोत.

Torani Benefits: सध्या देशातील अनेक शहरांमध्ये उन्हाचा पारा चांगलाच वाढत आहे. दिवसेंदिवस गरमी लोकांची हालत बेकार करत आहे. लोकांना आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होत आहेत. उष्माघातामुळे लोकांचे जीवही जात आहेत. अशात शरीर थंड ठेवणं फार महत्वाचं आहे. शरीराचं तापमान संतुलित ठेवण्यासाठी तुम्ही एक खास उपाय करू शकता. हा उपाय तुम्हाला भीषण गरमीपासून वाचवू शकतो. आज याच सुपरफूडबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. याचे फायदे काय आणि ते कसं करावं हेही सांगणार आहोत.

तांदळाचं पाणी

तांदळाचं पाणी प्यायल्याने हीट स्ट्रोकपासून बचावाचा सोपा उपाय आहे. हे एक हेल्दी ड्रिंक आहे. उष्णतेच्या लाटेत शरीर थंड ठेवण्याचं काम हे पेय करतं. सोबतच याच्या सेवनाने उन्हामुळे आलेला थकवाही दूर करता येतो. यात भरपूर व्हिटॅमिन बी, इलेक्ट्रोलाइट्स, अमीनो अॅसिड आणि सहजपणे पचन होणारे कार्ब्स भरपूर आहेत. यातील प्रोबायोटिक्स पोट निरोगी ठेवतात आणि गरम वातावरणात इम्यूनिटीही वाढवतात.

पचन तंत्रासाठी फायदेशीर

जसजशी उष्णता वाढते तसतशा पोटासंबंधी समस्या वाढत जातात. अशात हे खास पेय टॉनिकसारखं काम करतं. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. जुलाब किंवा बद्धकोष्ठता अशा समस्यांपासून बचाव होतो. तसेच आतड्यांचा आरोग्यही चांगलं राहतं.

त्वचेसाठीही फायदेशीर

जास्त उष्णतेमुळे त्वचा कोरडी किंवा रखरखीत होते. अशात तांदळाचं पाणी त्वचेला हायड्रेट ठेवतं. तांदळाचं पाणी प्यायल्याने त्वचेचा ओलावा कायम राहतो आणि त्वचेसंबंधी इतर समस्याही दूर होतात.

कसं तयार कराल हे पाणी?

- सगळ्यात आधी शिजवलेले तांदूळ रात्रभर भिजवून ठेवा.

- सकाळी तांदळाचं पाणी गाळून वेगळं करा. 

- नंतर या पाण्यात दही टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.

- त्यानंतर यात आलं, कढीपत्ता, हिरवी मिरची मीठ आणि जिरं पावडर टाका. शेवटी थोडा लिंबाचा रस टाका.तुमच्या सोयीनुसार तुम्ही यात पाणी टाकून पेय पातळ किंवा घट्ट करू शकता. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य