हवेत कसा पसरतो हंटाव्हायरस? कोविडसारखा धोका नाही, पण चुकूनही करून 'नका' या ३ चुका....
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 10:14 IST2026-05-10T10:13:50+5:302026-05-10T10:14:19+5:30
Hantavirus : कोरोनामुळे काय झालं होतं हे अजूनही लोकांच्या मनातून पूर्णपणे गेलेलं नाही. त्यामुळे आता हंटाव्हायरसमुळेही लोकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले आहेत.

हवेत कसा पसरतो हंटाव्हायरस? कोविडसारखा धोका नाही, पण चुकूनही करून 'नका' या ३ चुका....
Hantavirus : हंटाव्हायरसने सध्या जगातील अनेक देशांची चिंता वाढवली आहे. या व्हायरलची लागण झाल्यानंतर आतापर्यंत ३ लोकांचा जीव गेल्याची माहिती समोर आलीये. त्यामुळे जगभरातील आरोग्यविभाग सतर्क झाले आहेत. सोबतच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने १२ देशांसाठी इशाराही जारी केला आहे. अशात हंटाव्हायरस कसा पसरतो, त्याची लागण कुणाला होऊ शकते आणि बचावाचे उपाय काय, हे पाहुयात.
कोरोनासारखा घातक आहे का हा व्हायरस?
कोरोनामुळे काय झालं होतं हे अजूनही लोकांच्या मनातून पूर्णपणे गेलेलं नाही. त्यामुळे आता हंटाव्हायरसमुळेही लोकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले आहेत. लोकांना प्रश्न पडलाय की, ही नवीन महामारी तर नाही ना? अशात यावर WHO ने स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी सांगितलं की, याचा धोका सामान्य जनतेला नाही. कारण हंटाव्हायरस हा कोविड-१९ सारखा परसत नाही. मग प्रश्न असाही उभा राहतो की, हा व्हायरस पसरतो तरी कसा?
कसा पसरतो हंटाव्हायरस?
डॉक्टर सांगतात की, या इन्फेक्शनचा मुख्य सोर्स मनुष्य नाहीत, तर उंदीर आहेत. जेव्हा इन्फेक्शन झालेले उंदीर बंद जागेत किंवा कमी हवा असलेल्या जागेत जसे की, जुने शेड, स्टोर रूम किंवा टेंटमध्ये आपलं मलमूत्र किंवा लाळ सोडतात तेव्हा व्हायरस हवेच्या बारीक कणांमध्ये मिसळतो. जेव्हा एखादी व्यक्ती त्या जागेवर श्वास घेतो, तेव्हा त्याला याची लागण होतं.
प्रवाशांसाठी आवश्यक माहिती
जे लोक नेहमीच ट्रॅकिंग, कँपिंग किंवा ग्रामीण भागांमध्ये वेळ घालवतात जसे की, अर्जेंटिना आणि चिलीमधील जंगली भाग, त्यांना जास्त सावध राहण्याची गरज आहे. जर आपण अशा एखाद्या प्रभावित भागातून परतले असाल तर आपल्या तब्येतीवर लक्ष ठेवा. ताप, थकवा किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर वेळीच डॉक्टरांना भेटा आणि आपल्या प्रवासाची माहिती द्या.
बचावाचे उपाय
हंटाव्हायरसपासून सुरक्षित राहणं फार सोपं आहे. आपलं घर आणि किचनला उंदरांपासून दूर ठेवा.
उंदरांची घाण स्वच्छ करण्यासाठी कोरडा झाडू किंवा व्हॅक्यूम क्लीनरचा वापर करू नका, कारण यानी व्हायरस हवेत उडतो.
नेहमीच हँड ग्लव्ह्स आणि मास्क वापरा. घाणीवर केमिकल स्प्रे करा आणि ओल्या कापडाने स्वच्छता करा.