शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी कॉंग्रेसला भगदाड, आमदार पुत्राचा १५ नगरसेवकांसह शिंदे गटात प्रवेश 

By अंकुश गुंडावार | Updated: May 26, 2023 13:07 IST

जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात भुकंप

अर्जुनी मोरगाव ( गोंदिया) : अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादीचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे सुपुत्र डॉ. सुगत यांनी सडक अर्जुनी व अर्जुनी मोरगावच्या १५ नगरसेवकांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी साडे अकरा वाजताचे सुमारास हा प्रवेश झाल्याची माहिती आहे.

डॉ. सुगत चंद्रिकापुरे हे भाजपत प्रवेश करणार अशा चर्चा होत्या. मात्र त्यांनी शिवसेना शिंदे गटात समर्थक नगरसेवकांसह प्रवेश केल्याची माहिती आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून ते नगरसेवकांच्या संपर्कात होते. अनेक ठिकाणी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी वाढविल्या होत्या. एवढ्या लवकर ते पक्ष सोडतील असे वाटले नव्हते. मात्र  गुरुवारी विमानाने नगरसेवकांना घेऊन ते मुंबईला पोहोचले. मुख्यमंत्र्यांशी बोलणी केली व पक्षप्रवेश करून घेतला. यात सडक अर्जुनी नगरपंचायतचे १२ व अर्जुनी मोरगाव नगरपंचायतचे ३ असे नगरसेवक असल्याचे समजते. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठे भगदाड पडले आहे. इतर राजकीय पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या गळाला लागले नाही. येणाऱ्या काळात आणखी किती कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करतात ते लवकरच कळेल.

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेनाgondiya-acगोंदियाEknath Shindeएकनाथ शिंदे