शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

आमचे संसार तुटण्यापासून वाचवा हो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2016 01:55 IST

‘ज्यांनी स्वत: उपाशी राहून आम्हाला शिकवलं, शिक्षक बनवलं त्या आई-वडिलांना आता आमची गरज असताना आम्ही त्यांची सेवा करू शकत नाही.

शिक्षकांची आर्त हाक : आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांचे उद्यापासून बेमुदत उपोषणगोंदिया : ‘ज्यांनी स्वत: उपाशी राहून आम्हाला शिकवलं, शिक्षक बनवलं त्या आई-वडिलांना आता आमची गरज असताना आम्ही त्यांची सेवा करू शकत नाही. आता आमचा भरला संसार तरी मोडू नका. पती एकीकडे तर पत्नी ६०० ते १००० किलोमीटर अंतरावरच्या जिल्ह्यात, कसा चालत असेल आमचा संसार? अहो चालतो कशाचा, चक्क तुटण्याच्या मार्गावर आहे. अनेकांचे तर घटस्फोटही झाले. पण आमची व्यथा ना जिल्हा परिषदेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी समजून घेतली, ना कोण्या अधिकाऱ्याने. आता एकमेव पर्याय म्हणून सहकुटुंबच उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे...’ही व्यथा शनिवारी शिक्षक आंतरजिल्हा बदली सहकार कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांसमोर मांडली. २०१२ पासून आंतरजिल्हा बदली होऊन स्वगृही गोंदिया जिल्ह्यात येऊ पाहणाऱ्या जिल्हा परिषदेच्या पायऱ्या झिजवून थकलेल्या गोंदिया जिल्ह्यातील मूळचे रहिवासी असलेल्या आणि राज्यातील इतर जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना कोणीही दाद देण्यास तयार नाही. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांपासून तर सर्व पदाधिकारी, एवढेच नाही तर विरोधी पक्षातील सदस्यांपर्यंत सदर शिक्षकांनी आंतरजिल्हा बदल्या सुरू करण्यासाठी गळ घातली. पण कोणाचाच पायपोस कोणात नसल्यामुळे टोलवाटोलवी करण्याशिवाय त्यांच्या हाती काहीही लागले नाही. त्यामुळे येत्या २८ मार्चपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू करीत असल्याचे कृती समितीचे रविंद्रकुमार अंबुले यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)जिल्हाभरात शिक्षकांची १०४ पदे रिक्त३० सप्टेंबर २०१५ च्या पटसंख्येवरून जिल्हा परिषदेच्या शाळांची संचमान्यता निश्चित करण्यात आली. त्यात पदोन्नतीची पदे भरल्यानंतर शिक्षकांची १०४ पदे रिक्त होणार असल्याची माहिती शिक्षक आंतरजिल्हा बदली कृती समितीला शिक्षण विभागाकडून देण्यात आली. मात्र ही प्रक्रिया करण्यास विलंब लावला जात आहे. मे महिन्यात पदोन्नतीची पदे भरली जातील. त्यानंतर आंतरजिल्हा बदल्या केल्या जातील असे सांगून जिल्हा परिषदेकडून चालढकलपणा केला जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.जिल्हा परिषदेला बाबुगिरीचे ग्रहणजिल्हा परिषदेत कोणातही ताळमेळ नाही. सर्व कारभार बाबुगिरीच्या हाती आहे. पदाधिकारीच नाही तर अधिकाऱ्यांचाही कोणावर वचक नाही. बदलीसंदर्भात विचारणा करण्यासाठी बाबूलोकांकडे गेलो तर दोन-तीन वर्षे इकडे येऊच नका, असा सल्ला ते देतात. कारभारात स्पष्टता नाही. त्यामुळे नेमके काय गौडबंगाल आहे हे आम्हाला कळायला मार्ग नाही. बाबूगिरीत अडकलेल्या जिल्हा परिषदेला कोणीतरी बाहेर काढावे, अशी अपेक्षा शिक्षकांनी व्यक्त केली.- असे शिक्षक, अशा व्यथाशुभांगी चौधरी : गोंदियातील तिरोडा माहेर असलेल्या शुभांगी चौधरी यवतमाळ जिल्ह्यात आपल्या १४ महिन्याच्या मुलीसोबत एकट्या राहतात. इकडे घरी पती आणि सासरे आहेत. पण पतीपत्नी एकत्रिकरणाचाही त्यांना लाभ मिळालेला नाही.रविंद्रकुमार अंबुले : गोंदियाचे अंबुले साडेसात वर्षांपासून हिंगोली जिल्ह्यात कार्यरत आहेत. शिकवून तुला आम्हीच दूर केले. त्यापेक्षा अशिक्षित ठेवून शेळ्या चारण्यासाठी पाठविले असते तर आमच्या जवळ तरी राहिला असता, अशी व्यथा त्यांचे आई-वडिल त्यांच्याकडे व्यक्त करतात.नंदकुमार उईके : पत्नी दासगाव येथे शिक्षिका तर उईके राज्याच्या दुसऱ्या टोकावरील कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. येण्याजाण्याच्या प्रवासातच ४ दिवस जातात. कसे यायचे, कुटुंबियांना कधी भेटायचे असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे.राहुल नंदागवळी :जालना जिल्ह्यात ड्युटी असलेले नंदागवळी म्हणतात, आता आमचे शिकवण्यातही लक्ष लागत नाही. मानसिकता बिघडत चालली. यासोबतच प्रकाश बन्सोड (परभणी), सुरेंद्र गौतम (नांदेड), राजकुमार वरखडे (गडचिरोली), मुकेश खरकाटे (हिंगोली), प्रमोद शहारे, तुषार सिंगनजुडे या शिक्षकांनीही आपल्या व्यथा मांडल्या.