शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

सडक-अर्जुनी तालुकाही झाला ग्रीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:29 IST

गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असतानाच आता सालेकसापाठोपाठ सडक-अर्जुनी तालुकाही ग्रीन झाला आहे. विशेष म्हणजे, मंगळवारी ...

गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असतानाच आता सालेकसापाठोपाठ सडक-अर्जुनी तालुकाही ग्रीन झाला आहे. विशेष म्हणजे, मंगळवारी (दि.९) जिल्ह्यात फक्त २ रुग्ण बाधित आढळले असून, तब्बल १२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यात सडक-अर्जुनी तालुका कोरोनामुक्त झाला.

जिल्ह्यात सोमवारी एकही रुग्ण कोरोनामुक्त झाला नव्हता व त्यात बाधितांची भर पडली होती, तर मंगळ‌वारी मात्र फक्त २ रुग्णांची भर पडली व तब्बल १२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने दिलासा मिळाला. यामुळेच आता सालेकसापाठोपाठ सडक-अर्जुनी तालुका ग्रीन झाला. विशेष म्हणजे, यानंतर आता अशीच दिलासादायक स्थिती राहिल्यास आणखी ४ तालुके कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहेत. यामध्ये गोरेगाव तालुक्यात १, आमगाव २, देवरी १ तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यात फक्त २ रुग्ण उरले आहेत. जिल्ह्यात आता एकूण ८० क्रियाशील रुग्ण उरले आहेत. त्यात गोंदिया व तिरोडा तालुक्यात सर्वाधिक रुग्ण दिसून येत आहेत. जिल्ह्यात गोंदिया व तिरोडा सुरुवातीपासूनच कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. मात्र, मध्यंतरी तिरोडा तालुक्याला मागे टाकून आमगाव तालुका दुसऱ्या क्रमांकावर आला होता. मात्र, आमगाव तालुक्यातील स्थिती नियंत्रणात आल्याने आता आमगाव तालुका सावरला असून, तेथे फक्त २ क्रियाशील रुग्ण असल्याने तिरोडा तालुका पुन्हा दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.