शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस लाइफ; ना ड्यूटीची वेळ, ना पगाराचा मेळ! (डमी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:29 IST

गोंदिया : शिस्त, गस्त आणी बंदोबस्त करणाऱ्या पोलिसांच्या डोक्यावर कामाचा ताण मोठ्या प्रमाणात आहे. या कामाच्या तणावाखाली असलेल्या पोलिसांना ...

गोंदिया : शिस्त, गस्त आणी बंदोबस्त करणाऱ्या पोलिसांच्या डोक्यावर कामाचा ताण मोठ्या प्रमाणात आहे. या कामाच्या तणावाखाली असलेल्या पोलिसांना विविध आजार जडतात. आपले आजार घेऊन २४ तास नोकरी करणाऱ्या पोलिसांना त्यांच्या हक्काचीही सुटी उपभोगता येत नाही. आपल्या हक्काच्या सुटीसाठी पोलीस अधिकाऱ्यांची जी हुजूरी करावी लागते. त्याशिवाय त्यांना सुटी दिली जात नाही. गोंदिया जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील असून, गोंदिया जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणात पोलीस यंत्रणा नाही. त्यामुळे नोकरी करणाऱ्या पोलिसांवर कामाचा मोठ्या प्रमाणात ताण आहे. २४ तास काम करणाऱ्या पोलिसांना नेहमीच तणावात राहावे लागते. एखाद्या कुजलेल्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यापासून गुन्हेगारांचा छडा लावण्यापर्यंतचे काम करूनही अनेकदा हक्काची सुटी मिळत नसल्याने पोलीस कर्मचारी आपल्याच विभागासंदर्भात अनेकदा संताप करीत असताना दिसतात; परंतु पोलीस विभागात शिस्त पाळावी लागत असल्याने मुकाट्याने अन्याय सहन करून ना आंदोलन, ना धरणे देण्याचा अधिकार पोलिसांना आहे. चूक असो किंवा नसो ‘बॉस इज ऑलवेज राइट’ अशाच भूमिकेत पोलिसांना राहावे लागते. इतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत त्यांना तुटपुंजे वेतन असते तेही अनेकदा वेळेवर मिळत नाही. फेब्रुवारी महिन्याची ९ तारीख गेली तरीही पोलिसांचे वेतन झाले नाही.

बॉक्स

२४ तासांची ड्यूटी

पोलिसांना २४ तासांची ड्यूटी करावी लागते. आठ तासांची एक पाळी केल्यानंतही गरजेनुसार त्या पोलिसांची ड्यूटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बंदोबस्त कसा राहील यानुसार लावण्यात येते.

बॉक्स

कुटुंबासाठी वेळ मिळत नाही

पोलिसांना आपल्या कुटुंबांना वेळ देण्यासाठी वेळच उरत नाही. नोकरीवरून परतल्यानंतर पत्नी किंवा मुलाबाळांना दुकानात खरेदीसाठी किंवा इतर ठिकाणी जाण्याची तयारी पोलिसांनी केली तर त्याच वेळी पोलीस ठाण्यातून कॉल आल्यास त्यांना सर्व कामे बाजूला सारून आधी पोलीस विभागाचे काम करावे लागते. अपुऱ्या मनुष्यबळामुळे ही स्थिती आहे.

बॉक्स

मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी पत्नीवर

मुलांचे शिक्षण करण्याची जबाबदारी पोलिसांना आपल्या पत्नीच्या खांद्यावर टाकावी लागते. मी ड्यूटी करतो तू मुलांना सांभाळ हेच ते आपल्या पत्नीला म्हणत असावेत. मुलांच्या शिक्षणाकडे त्यांच्या पत्नीच लक्ष घालतात. नियमित काम करणाऱ्या पोलिसांना मुलांकडेही लक्ष द्यायला वेळ मिळत नाही.

बॉक्स

११८ पोलिसांना घरे

गोंदिया जिल्ह्यात २ हजार १९० पोलीस कर्मचारी आहेत. यापैकी ११८ पोलिसांना घरांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. ४९० पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस वसाहतीत क्वाटर्स मिळाले आहेत. ९२ पोलीस कर्मचाऱ्यांनी होम फायनान्ससाठी अर्ज केला; परंतु त्यातील एकही अर्ज अद्याप मंजूर झाले नाही.

......

जिल्ह्यातील पोलीस - २१९०

जिल्ह्यातील पोलिसांना घरे - ११८

.....