पिकअपची दुचाकीला धडक : ३ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 06:00 AM2019-10-23T06:00:00+5:302019-10-23T06:00:23+5:30

पिकअप वाहन क्रमांक एमएच ३५-एजे १२३९ हे गोंदियाहून कोहमाराकडे जात होते. तर दुचाकी स्वार एमएच ३५ बीएल ४०१५ या दुचाकीने गांगलवाडीकडून गोंदियाकडे येत होते. दरम्यान दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाला सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी गावाजवळ धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की यात दुचाकी स्वार तिन्ही युवकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

Pickup bike hit: 3 killed | पिकअपची दुचाकीला धडक : ३ ठार

पिकअपची दुचाकीला धडक : ३ ठार

Next
ठळक मुद्देखजरीजवळील घटना : मृतांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
खजरी : पिकअप वाहन आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीवर स्वार असलेल्या तीन युवकांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास सडक अर्जुनी तालुक्यातील खजरीजवळ घडली. किशोर नीलकंठ पगाडे (वय २०), अंकुश माणिक खारकर (वय २२) गांगलवाडी, सत्यम आत्माराम बनकर (वय २२) रा.गोगाव, ता. ब्रह्मपुरी, जिल्हा चंद्रपूर अशी अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार पिकअप वाहन क्रमांक एमएच ३५-एजे १२३९ हे गोंदियाहून कोहमाराकडे जात होते. तर दुचाकी स्वार एमएच ३५ बीएल ४०१५ या दुचाकीने गांगलवाडीकडून गोंदियाकडे येत होते. दरम्यान दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाला सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी गावाजवळ धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की यात दुचाकी स्वार तिन्ही युवकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान रस्त्यालगत शेतामध्ये काम करीत असलेले मजूर अपघाताग्रस्तांच्या मदतीसाठी धावून गेले. मात्र दुचाकीस्वार तिन्ही युवकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.या अपघाताची माहिती डुग्गीपार पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचत पंचनामा करुन गुन्हा नोंद केला.

Web Title: Pickup bike hit: 3 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात