तरूणांमध्ये वाढतेय संघटित गुन्हेगारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 06:00 AM2020-01-12T06:00:00+5:302020-01-12T06:00:15+5:30

क्षुल्लक कारणावरून बाचाबाची झाली तरी त्या बाचाबाचीतून खून करण्यापर्यंतची मजल शहरातील तरूण करीत आहेत. कायदा कितीही कडक असला आणि कायद्याचे पालन करणारे पोलीस अधिकारी कितीही कर्तव्यदक्ष असले तरी अल्पवयातच मुलांवर योग्य संस्कार होत नसल्यामुळे ती बालके शाळेत जाता-जाताच मित्रांच्या नादात गुन्हेगारी जगतात प्रवेश करतात. क्षुल्लक कारणातून खून करण्यापर्यंतची खूनस ठेवणे त्यासाठी संघटीत गुन्हेगारी करणे असा फॅड शहरात वाढत आहे.

The organized crime among youth is increasing | तरूणांमध्ये वाढतेय संघटित गुन्हेगारी

तरूणांमध्ये वाढतेय संघटित गुन्हेगारी

googlenewsNext
ठळक मुद्देसंडे अँकर। आठ जणांवर मकोका,क्षुल्लक कारणातून घडताहेत मोठे गुन्हे

नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील अल्पवयीन मुले व तरूणांमध्ये संघटीत गुन्हेगारी वाढत आहे. क्षुल्लक कारणातून गंभीर गुन्हे घडत असून वाढणाऱ्या संघटीत गुन्हेगारीवर वचक बसविण्यासाठी पोलीस यंत्रणा काम करीत आहे. परंतु शालेय वयात असलेल्या मुलांकडे त्यांच्या पालकांचे सतत होणारे दुर्लक्ष त्या बालकांना संघटीत गुन्हेगारीकडे ओढावून घेत आहे. अशाच आठ तरूणांवर गोंदिया शहर पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा १९९९ (मकोका) लावला आहे.
क्षुल्लक कारणावरून बाचाबाची झाली तरी त्या बाचाबाचीतून खून करण्यापर्यंतची मजल शहरातील तरूण करीत आहेत. कायदा कितीही कडक असला आणि कायद्याचे पालन करणारे पोलीस अधिकारी कितीही कर्तव्यदक्ष असले तरी अल्पवयातच मुलांवर योग्य संस्कार होत नसल्यामुळे ती बालके शाळेत जाता-जाताच मित्रांच्या नादात गुन्हेगारी जगतात प्रवेश करतात. क्षुल्लक कारणातून खून करण्यापर्यंतची खूनस ठेवणे त्यासाठी संघटीत गुन्हेगारी करणे असा फॅड शहरात वाढत आहे. गोंदिया शहरातील चंद्रशेखर वॉर्डातील महेंद्रसिंग किसनसिंग सोलंकी (६०) यांच्या घरी २९ मे २०१८ च्या रात्री १ वाजता ११ तरूणांनी जाऊन काठ्या, तलवार घेऊन त्यांच्या मुलाचा खून करण्याच्या उद्देशाने त्यांच्या घराच्या गेटवर दगड, विटा टाकून खिडक्यांच्या काचाही फोडल्या होत्या.त्यामुळे घरातील सर्व मंडळी जागे झाले होते. हल्ला जोरात केल्याने मोहल्ल्यातील लोक गोळा झाले. परिणामी आरोपी त्या ठिकाणातून फरार झाले. रात्री १ वाजताच्या सुमारास ११ तरूण गोळा होऊन एखाद्याचा जीव घेण्याच्या उद्देशाने लाठी, तलवार घेऊन खून करण्याच्या तयारीत घरासमोर उभे असतात. जोजोराने आवाज देऊन त्यांच्या गेटवर आपला आक्रोश काढतात. रात्री १ वाजताच्या सुमारास आपल्या घरातील तरूण मुलगा आपल्या घरी नाही तो कुणाचा तरी खून करायला निघाला आणि त्याला आवर न घालता मोकाट सोडणारे पालक त्यांच्या भविष्याची चिंता न करता रात्रीलाही आपला मुलगा घरी नाही याची किंचीतही चिंता करीत नाहीत. पालकांचे मुलांकडे सतत होणारे दुर्लक्ष, केवळ पैसा कमविण्याचा नाद, जडलेले व्यसन यामुळे पालक मंडळी आपल्या मुलांकडे लक्ष देत नाही. परिणामी ती बालके संघटीत गुन्हेगारीकडे वळत आहेत.
सतत मित्रांच्या सानिध्यात राहणारे तरूण मनात येईल तसेच वागण्याचा प्रयत्न करतात. त्यातच त्यांच्या मनावर क्राईम पेट्रोल सिरीयल पाहून आपले क्राईम जगतात मोठे नाव करण्याचे अनेक तरूणांचे स्वप्न असल्याचे तपासात काही तरूणांकडून लक्षात आले. गोंदिया शहर छोटे असूनही शहरात अल्पवयीन मुले किंवा तरूण शिक्षणाचा नाद सोडून मित्रता चालविण्यासाठी संघटीत गुन्हेगारीकडे वळत आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक नार्वेकर यांनी केला आहे. ११ जणांपैकी तीन अल्पवयीन मुले असल्याने ८ जणांना अटक करून त्यांच्यावर भादंविच्या कलम ४४९, ४५२, ४२७, १४३, १४७, १४८, १४९, ५०६, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. तपासात हे तरूण भविष्यात संघटीत गुन्हेगारीतून काय दहशत माजवू शकतात याची प्रचिती पोलिसांना आल्यामुळे त्यांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा १९९९ चे कलम ३ (१), (आयआय), ३ (२), ३ (४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे
गोंदिया शहरातील गुन्हेगारीच्या वाढत्या घटना पाहता प्रेम प्रकरणातून शारीरिक हानीचे गुन्हे शहरात होत आहे. रामनगर पसिरात असलेल्या चौपाटी पसिरात हे गुन्हे दोन वर्षाआधी जास्त पाहायला मिळत होते. परंतु आताही प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुले मारामारी, खून किंवा खुनाचा प्रयत्न असे गुन्हे करीत आहेत. आपल्या पाल्यांकडे पालकांचे सतत होणारे दुर्लक्ष त्या पाल्यांना गुन्हेगारी जगताकडे नेत आहे.

या तरूणांवर लागला मकोका
गोंदियातील आठ तरूणांवर मकोका लागला आहे. त्यात विक्की अशोकुकमार मनकानी (२५) रा. श्रीनगर गोंदिया, संदीप लक्षमीकांत चौधरी (१९) रा. श्रीनगर गोंदिया, मयूर देवेंद्र श्यामकुवर (१९) रा.श्रीनगर गोंदिया, पवन अशोक वैद्य (२१) एमआयडीसी राजू नगर नागपूर, रवी राजकुमार यादव (२२) रा. गौतमनगर गोंदिया, आकाश वासुदेव अंबादे (२३) रा.गौतमनगर गोंदिया, शुभम गोपाल चव्हाण उर्फ शुभम परदेशी (२६) रा.गौशाला वॉर्ड गोंदिया, आशितोष उर्फ आसू रजनिकांत डोंगरे (१९) रा. गौतमनगर गोंदिया या आठ जणांवर मकोका लागला आहे. या प्रकरणात आणखी तीन विधी संघर्षीत बालकांचा समावेश आहे

Web Title: The organized crime among youth is increasing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.