शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

मिळाले फक्त ५४ लाख

By admin | Updated: March 27, 2016 01:52 IST

स्वच्छ महाराष्ट्र मिशन अंतर्गत राबविण्यात येत असलेला शौचालय बांधकामाचा कार्यक्रम आता अडचणीत आला आहे.

२.१६ कोटींची गरज : शौचालय बांधकाम अडचणीतगोंदिया : स्वच्छ महाराष्ट्र मिशन अंतर्गत राबविण्यात येत असलेला शौचालय बांधकामाचा कार्यक्रम आता अडचणीत आला आहे. कारण शौचालय बांधकामासाठी नगर परिषदेने दोन कोटी १६ लाख रूपयांची मागणी शासनाकडे केली होती. मात्र फक्त ५४ लाख रूपयांचा निधी पालिकेला मिळाला असल्याने लाभार्थ्यांना अनुदान द्यावे तरी कसे हा प्रश्न विभागाला पडला आहे. देशातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे. याकरिता शहरांना स्वच्छता आणि शहरांमधील सर्व नागरिकांना शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देऊन हे ध्येय गाठण्यासाठी केंद्र शासनाकडून स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे. शहरांत राबविण्यात येणाऱ्या या नागरी स्वच्छ भारत अभियानांतर्गत पात्र लाभार्थी कुटूंबास वैयक्तीक शौचालय बांधकामासाठी अनुदान देऊन शौचालय तयार करवून घेतले जात आहेत. यासाठी नगर पालिका क्षेत्रातील वैयक्तीक शौचालय नसलेल्या व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. शहरात राबविण्यात येत असलेल्या मोहिमेंतर्गत पालिकेला ९४ लाख रूपयांचा निधी मिळाला होता. तो निधी अनुदान स्वरूपात वितरीत करण्यात आला आहे. त्यामुळे लाभार्थींना अनुदान देण्यासाठी पालिकेला आणखी निधीची गरज आहे. यासाठी नगर परिषदेने शासनाकडे दोन कोटी १६ लाख रूपयांची मागणी केली होती. मात्र शासनाकडून फक्त ५४ लाख रूपयांचा निधीच मिळाला आहे. अशात शौचालयांचे बांधकाम सुरू असलेल्या लाभार्थ्यांना अनुदान द्यावे, की उर्वरीत लाभार्थ्यांना शौचालय बांधकाम सुरू करण्यास सांगावे असा प्रश्न येथे विभागाला पडला आहे. (शहर प्रतिनिधी)१५७१ अर्ज शिल्लकशौचालय बांधकामांतर्गत पात्र लाभार्थ्याला केंद्र शासनाकडून चारहजार रूये व राज्य शासनाकडून आठ हजार रूपये असे एकूण १२ हजार रूपये अनुदान दिले जाणार आहे. त्यात नगर परिषदेला तीन हजार रूपये वैयक्तीक शौचालयांसाठी तर २५ हजार रूपये सार्वजनिक शौचालय बांधकामासाठी द्यावयाचे आहेत. त्यानुसार पालिकेने १२०० लाभार्थींना पहिल्या टप्याचे अनुदान वाटप केले आहे. आता या ५४ लाखांतून दुसरा टप्पा दिला जाणार असल्याची माहिती आहे. याशिवाय आणखी १५७१ अर्ज शिल्लक असून निधी आल्यावरच त्यांना शौचालय बांधकाम सुरू करता येणार असल्याचे दिसते.