शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

दिंडीतून दिला ‘जल बचाव’चा संदेश

By admin | Updated: March 27, 2016 01:57 IST

मानवाचे जीवन फुलविण्यासाठी जल व जंगल वाचविण्याची गरज आहे. जल आणि जंगल या दोघांवर संकट ओढावल्याने ग्लोबल वार्र्मींगचा फटका मानवाला सहन करावा लागत आहे.

आमगाव : मानवाचे जीवन फुलविण्यासाठी जल व जंगल वाचविण्याची गरज आहे. जल आणि जंगल या दोघांवर संकट ओढावल्याने ग्लोबल वार्र्मींगचा फटका मानवाला सहन करावा लागत आहे. यावर बचाव म्हणून झाडे लावा झाडे जगवा संदेश देत जलबाचाव चा नारा लावत पदमपूर येथे यशोदा बहुउद्देशिय विकास संस्था व उडाण बहुउद्देशिय विकास संस्था पदमपूर तर्फे आज (दि. २६) रोजी जलदिंडी काढण्यात आली.या दिंडीची सुरूवात सकाळी भवभूती महाविद्यालयाच्या प्रांगणातून सुरूवात करण्यात आली. आमगाव येथील सामाजिक कार्यकर्ता गोविंद तिराले, बनगावचे माजी सरपंच जमील पाठण, भवभूती महाविद्यालयाचे प्रा. सुधीर घुसे, प्रा. विजय फुंडे, प्रा. रमेश बावनथडे, प्रा. शध्दोधन शहारे, कांताप्रसाद मिश्रा यांच्याहस्ते जलहंडीचे पूजन करून दिंडीला सुरूवात करण्यात आली. जलदिंडीत सहभागी झालेल्या तरूणांनी जल वाचवा, वृक्ष वाचवा, पाण्याचा अपव्यय टाळा अश्या विविध घोषणा देत नागरिकांना जागृत केले. आज पाणी वाया जाईल तर उद्या तहान जीव घेईल असे सांगत ग्रामीण जनतेला पाण्याचे महत्व पटवून देण्यात आले. दिंडी सुरू असतांना गावातील चौकाचौकात थांबून तरूणांनी पथनाट्य सादर करून पाणी व वृक्षांचे महत्व सांगण्यात आले. यावेळी अतिथींनी मार्गदर्शन केले.यशोदा बहुउद्देशिय विकास संस्था व उडाण बहुउद्देशिय विकास संस्था पदमपूर यांच्या पुढाकाराने काढलेल्या दिंडीत नागरिकही सहभागी झाले. गावभ्रमण केल्यानंतर या दिंडीचा समारोप करण्यात आला. सदर दिंडीत नरेश बोहरे, यशोदा बहुइद्देशीय संथेचे अध्यक्ष हरिष भुते, उडाणचे अध्यक्ष आशिष तलमले, रवि मेंढे, राजेश वाढई, दिनेश गिऱ्हेपुंजे, नंदकुमार भेदे, शैलेश अरकरा, कमलेश रहिले, गोपाल भांडारकर, कृष्णा भेदे, ललीत मेश्राम, राकेश गुरव, संदीप विठ्ठले, मुकेश शिवणकर, डिलेश्वर वंजारी, रोहीत खोटेले, प्रमोद भेदे, प्रीनल वंजारी, रामेश्वर चोपकर, प्रकाश रहिले, कार्तिक बिसेन, सुरेश चुटे, राजेश जांभूळकर, चंद्रकुमार देशकर, मंगेश सोनकनवरे, भुमेश्वर बागडे, विवेक थेर, राकेश शिवणकर, प्रतिक करंडे, जितेंद्र फुंडे, रोहीत फुंडे, उज्वल वंजारी, वतन भौतीक यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे संचालन नरेश रहिले व आभार अतुल फुंडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यशोदा बहुउद्देशिय विकास संस्था व उडाण बहुउद्देशिय विकास संस्था पदमपूरच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)तरूणांनी केला संकल्पआपल्या परिसरात होत असलेला पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आपण पुढाकार घेऊन त्या व्यक्तींमध्ये जनजागृती करण्याचा संकल्प दिंडीत सहभागी झालेल्या तरूणांनी घेतला आहे. पाणी हेच जीवन आहे त्याला विनासापासून थांबविण्याची गरज असल्याची समज प्रत्येकाला देऊ असे रॅलीत सहभागी झालेल्या तरूणांचे म्हणणे आहे.