शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या पोर्टलमुळे समस्या निवारणास मदत

By admin | Updated: March 18, 2017 01:57 IST

राज्यात फडणवीस सरकारने सुरु केलेले आपले सरकार पोर्टल हे जनतेच्या फायद्याचे ठरत असून तालुक्यातील आतापर्यंत ....

तिरोडा : राज्यात फडणवीस सरकारने सुरु केलेले आपले सरकार पोर्टल हे जनतेच्या फायद्याचे ठरत असून तालुक्यातील आतापर्यंत दोन समस्यांचे निराकरण होऊन त्यांच्या अडचणी दूर केलेल्या आहेत, असे आमदार विजय रहांगडाले यांनी कळविले आहे. यामध्ये डोंगरगाव खडकी येथील गोवर्धन भाऊजी पटले यांचे माहे जूनपासून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत एकूण १२ हजार ७९६ रुपये खात्यात जमा न झाल्यामुळे पटले यांनी वारंवार संबंधित संपर्क साधला असता १५ दिवसांचा कालावधी देण्यात आला. परंतु १५ दिवसांचे आठ महिने लोटूनही त्यांच्या खात्यावर पैसे जमा न झाल्यामुळे पटले यांनी आमदार रहांगडाले यांचे स्विय सहायक विवेक ढोरे यांच्याशी संपर्क साधला. तसेच संबंधित यंत्रणेला दिलेल्या कार्यालयीन पत्रावर जिल्हाधिकारी रोहयो यांच्याकडे तसेच शिफारसपत्रासह आपले सरकार या पोर्टलवर तक्रार नोंदविली. त्यावर त्वरित कार्यवाही होऊन जिल्हाधिकारी रोहयो यांच्यातर्फे आदेशीत करुन २० दिवसांच्या आत पटले यांच्या खात्यावर पगाराचा पहिला हप्ता म्हणून पाच हजार ९४ जमा करण्यात आले. तसेच दुसरा हप्ता मार्च अखेर जमा करण्याचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे मौजा गांगला येथील मग्रारोहयो अंतर्गत सन २०१५-१६ चे रस्ता बांधकामाचा निधी तीन लक्ष ३४ हजार रूपये वारंवार पत्रव्यवहार करुन सुद्धा जमा झाला नाही. यात ढोरे यांच्या मदतीने पोर्टलवर तक्रार दाखल केल्यानंतर ३५ दिवसांच्या कालावधीमध्ये ग्रामपंचायत गांगलाच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात आली. यातून आपले सरकार पोर्टल जनतेसाठी फायद्याचे ठरत असून जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जनसंपर्क कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहन आमदार रहांगडाले यांनी केले.