शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
3
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
4
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
5
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
6
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
7
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
8
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
9
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
11
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
12
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
13
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
14
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
16
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
17
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
18
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
19
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
20
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे देना बँकेचे व्यवहार ठप्प

By admin | Updated: November 12, 2014 22:46 IST

शहरात बऱ्याच वर्षापासून सुरू असलेली देना बँकेत आज कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे पैशाची देवाण घेवाण पुर्णत: बंद असल्याने ग्राहकाकडून संताप व्यक्त केला जात आहे.

देवरी : शहरात बऱ्याच वर्षापासून सुरू असलेली देना बँकेत आज कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे पैशाची देवाण घेवाण पुर्णत: बंद असल्याने ग्राहकाकडून संताप व्यक्त केला जात आहे.मंगळवारी आठवडी बाजाराचा दिवस असल्याने शहरातील तसेच ग्रामीण भागातील लोक बऱ्याच संख्येत ११ वाजता पैशाचे व्यवहार करण्याकरीता बँकेत पोहोचले. परंतु बँकेतील मुख्य कर्मचारी, उपलेखापाल व व्यवस्थापक गैरहजर असल्याने विड्रॉल फार्मवर कोण स्वाक्षरी करणार? हा प्रश्न तेथील उपस्थित रोख व लिपीक पडला त्यामुळे त्यांनी ग्राहकांना सांगितले की, आज पैशाचे व्यवहार होणार नाही. हे ऐकताच ग्राहकांची तारांबळ उडाली. त्यांनी संताप व्यक्त करीत बँकेतुन खाली हात परतले.प्राप्त माहितीनुसार मागील २० दिवसांपासून बँकेचे व्यवस्थापक सुधाकर नाना रंगारी बेपत्ता होते. तसेच उप लेखापाल महिला कर्मचारी सुट्टीवर आहेत. अशावेळी बँक व्यवस्थापकाद्वारे दुसरी कोणतीच उपाययोजना न केल्याने आज ग्राहकांना खाली हाताने परतावे लागले.विशेष म्हणजे या बँकेत सामान्य नागरिकांव्यतिरिक्त व्यापारी वर्ग निराधार वृद्ध, महिला, घरकुल योजना व मनरेगाचे हजारो खाते असल्याने दररोज या बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी असते. बँकेची इमारत छोटी असल्यामुळे बरेचदा ग्राहकांना बँकेच्या बाहेर उन्हात उभे राहावे लागते. एटीएम मशीन शोभेची वास्तू बनवून ठेवण्यात आली आहे. सुरक्षा कर्मी व पार्किंगची सुविधा नाही. या संगळ्या अव्यवस्थेत बँकेत व्यवस्थापक नसने ही ग्राहकांसाठी चितेंची बाब आहे. देना बँकेच्या उच्च अधिकाराऱ्यांच्या दुर्लक्षामुळे देना बँकेच्या देवरी शाखेचे भविष्य संकटात असल्याचे बोलल्या जात आहे. देना बँकेच्या वरिष्ट स्तरावरील अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)