शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

धानाचा बोनस त्वरित जमा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 05:00 IST

शासनाच्या माध्यमातून सन २०२०-२१ मध्ये खरेदी केलेल्या धानाला ७०० रुपये बोनस घोषित करण्यात आला होता. मात्र, तो अद्याप शेतकऱ्यांना मिळाला नाही. रबी धानाची ६५ हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली असून, सुमारे २८.५० लक्ष क्विंटल धान उत्पादन अपेक्षित असून आतापर्यंत धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना खुल्या बाजारात बेभाव धान विकावे लागत आहे.

ठळक मुद्देभारतीय जनता पक्षाची मागणी : शेतकऱ्यांच्या हक्कासाठी केले धरणे आंदोलन

लाेकमत न्यूज नेटवर्कगोंदिया  : खरीप हंगामातील खरेदी केलेल्या धानाला ७०० रुपये प्रतिक्विंटल बोनस देण्याचे शासनाने घोषित केले होते. मात्र, आता ८ महिने होत असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बोनसची रक्कम जमा झालेली नाही. धानाचा बोनस त्वरित जमा करा यासह अन्य मागण्यांसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने दिलेल्या इशाऱ्यानुसार गुरुवारी (दि.२७) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. शासनाच्या माध्यमातून सन २०२०-२१ मध्ये खरेदी केलेल्या धानाला ७०० रुपये बोनस घोषित करण्यात आला होता. मात्र, तो अद्याप शेतकऱ्यांना मिळाला नाही. रबी धानाची ६५ हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली असून, सुमारे २८.५० लक्ष क्विंटल धान उत्पादन अपेक्षित असून आतापर्यंत धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना खुल्या बाजारात बेभाव धान विकावे लागत आहे. धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत ११०० धडक सिंचन विहिरी मंजूर करण्यात आल्या असून, शेतकऱ्यांनी सावकारी कर्ज घेऊन काम पूर्ण केले. मात्र, त्यांना पैसे देण्यात आले नाही. जिल्ह्यात २०२० पर्यंत ६९ धान खरेदी केंद्र होते. नव्याने ४२ केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, ज्या केंद्रांना मंजुरी दिली, त्यांना खरेदीचे आदेश देण्यात आले नाही किंवा ज्यांच्याकडे गोदाम उपलब्ध नाही, अशा केंद्रांना मंजुरी का देण्यात आली, असा प्रश्न करत भाजपने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. तसेच २५ मेपर्यंत सर्व धान खरेदी केंद्रे सुरू न झाल्यास गुरुवारी (दि.२७) धरणे आंदोलन करणार, असा इशारा दिला होता. त्यानुसार, भाजपच्या वतीने गुरुवारी (दि.२७) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष केशव मानकर, प्रदेश उपाध्यक्ष हेमंत पटले, आमदार विजय रहांगडाले, आमदार डॉ. परिणय फुके, माजी आमदार गोपालदास अग्रवाल, भेरसिंग नागपुरे, रमेश कुथे, नगराध्यक्ष अशोक इंगळे, दीपक कदम, सुनील केलनका, संजय मुरकुटे, बंटी पंचबुद्धे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  

या आहेत आंदोलनातील मागण्या - रबी हंगामातील धान पिकाची खरेदी केंद्रांवर प्रत्यक्षात खरेदी करा, खरीप हंगामातील ७०० रुपये बोनस द्या, धडक सिंचन विहिरी योजनेचे पैसे द्या, कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना घोषित केलेली ५० हजार रुपयांची प्रोत्साहन राशी द्या, तसेच शेतकऱ्यांना नवीन वीज जोडणी द्या या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलन