शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणासोबतच चांगला माणूस निर्माण करा!

By admin | Updated: March 23, 2017 01:08 IST

बौद्धिक ज्ञानवृद्धी व यशस्वी जीवन जगण्यासाठी शिक्षण अत्यावश्यक आहे. घराघरातून बाल मनावर संस्कार दिले गेले पाहिजे.

संजय पुराम : भरनोली येथील डिजिटल शाळेचे उद्घाटन अर्जुनी-मोरगाव : बौद्धिक ज्ञानवृद्धी व यशस्वी जीवन जगण्यासाठी शिक्षण अत्यावश्यक आहे. घराघरातून बाल मनावर संस्कार दिले गेले पाहिजे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी देशवासीयांना ‘माणूस द्या मज माणूस द्या’ हा मूलमंत्र दिला. याप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासोबतच ‘माणूस’ निर्माण करण्याची नितांत आवश्यकता आहे. गुरुजनांनी कर्तव्य म्हणून हे कार्य करावे, असे आवाहन आ. संजय पुराम यांनी केले. ते आदिवासी, दुर्गम क्षेत्रात येणाऱ्या भरनोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या डिजिटल शाळा उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प.चे माजी अर्थ व बांधकाम सभापती प्रकाश गहाणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पं.स.सदस्य रामलाल मुंगणकर, पं.स.चे माजी सभापती तानेश ताराम, भरनोली गट ग्रा.पं.च्या सरपंच प्रमिला कोरामी, कन्हैयालाल राऊत, माणिक ठलाल, प्रेमानंद मसराम, गोंगलू ताराम, संजय मानकर, एकनाथ चुटे, उध्दव ताराम, भुमेश्वर ताराम, केंद्रप्रमुख वाय.बी. येल्ले, ग्रामसेवक नरेश बडोले, शिक्षक संघटनेचे कैलास हांडगे, विनोद बडोले, सुरेंद्रकुमार ठवरे उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, शिक्षण हे अजरामर आहे. ते मृत्यूपर्यंत संपत नाही. विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित केले पाहिजे. मोठी स्वप्नं बघितली पाहिजे. ध्येय निश्चितीकडे वाटचाल करताना अनेक अडचणी येतात. आईवडील व गुरुजनांचे निसंकोचपणे मार्गदर्शन घेऊन मार्गक्रमण केल्यास यशोशिखर गाठता येते. शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत ग्रामीण विद्यार्थी लाजाळू पण हुशार असतात. वावरताना न्यूनगंड बाळगू नका. पालकांनी मुलांवर निश्चित प्रेम केलं पाहिजे. पण त्यात आंधळे होऊ नका. कर्करोग हा असाध्य आजार उपचाराने बरा होऊ शकतो. मात्र हल्लीची पिढी मोबाईलच्या अत्याधिक वापरापासून बरी होत नाही. पालकांनी नियंत्रण घातले पाहिजे. माणूस कितीही मोठा झाला तरी त्याने जूने दिवस व मातृभूमीचे प्रेम कदापी विसरु नये. प्रत्येकाने पदाचा वापर लोकसेवेसाठी केला पाहिजे, असे प्रतिपादन केले. तत्पूर्वी आदिवासी, नक्षलग्रस्त भागातील केवळ ४० पटसंख्या असलेल्या भरनोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या डिजिटल शाळेचे उद्घाटन करण्यात आले. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेली ही शाळा लोकसहभागातून डिजिटल शाळा म्हणून नावारुपास आली. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना संगणक हाताळणीसह शैक्षणिक तंत्रज्ञानाची जाणीव व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार आहे. यावेळी याच शाळेतून शिक्षण घेऊन उच्च पदावर जाणारे प्रा. धनराज करचाल, पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम, शाळेसाठी जमीनदाते घुंगरु ताराम, चरणदास कऱ्हाडे व सदू दर्रो यांचा शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मुख्याध्यापक नाईक यांनी मांडले. संचालन प्रफुल्ल कुंभरे यांनी केले. आभार शिक्षिका बोरकर यांनी मानले.(तालुका प्रतिनिधी)