शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता कर्मचाऱ्यांना घ्यावे लागणार गाव दत्तक

By admin | Updated: October 20, 2014 23:14 IST

अस्वच्छतेमुळे होणारी रोगराई पाहून शासनाने निर्मल ग्राम अभियानाची सुरूवात केली. परंतु या अभियानाला अधिकारी, कर्मचारीच पाहिजे तेवढ्या प्रमाणात प्रतिसाद देत नसल्याचे समजल्याने आता निर्मल भारत

युनिसेफचा निर्णय : निर्मल ग्रामांसाठी घेतला पुढाकारनरेश रहिले - गोंदियाअस्वच्छतेमुळे होणारी रोगराई पाहून शासनाने निर्मल ग्राम अभियानाची सुरूवात केली. परंतु या अभियानाला अधिकारी, कर्मचारीच पाहिजे तेवढ्या प्रमाणात प्रतिसाद देत नसल्याचे समजल्याने आता निर्मल भारत अभियानाच्या अंमलबजावणीत कर्मचाऱ्यांना जन्मगाव व कार्यक्षेत्रातील एक गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी दत्तक घ्यावे लागणार आहे. निर्मल भारत अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी आढावा बैठक लोणावळा येथे घेण्यात झाली होती. युनिसेफच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या बैठकीत उपायुक्त विकास, भारत निर्माणचे अधीक्षक अभियंता, पाणी व स्वच्छता अभियानाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व कार्यकारी अभियंता, सर्व जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अभियंता, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षामधील सल्लागार तज्ञ सहभागी झाले होते. सदर कार्यशाळेत झालेल्या चर्चेदरम्यान पाणी पुरवठा जे प्रधान सचिव यांनी उपस्थित अधिकारी सल्लागार व तज्ज्ञांना आवाहन करून स्वच्छता विभागात काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील एक गाव व जन्म गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी दत्तक घेण्याचा निर्धार करावा असे आवाहन केले. त्यानुसार सदर पत्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना पाठविण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी व स्वच्छता मिशनमध्ये कार्यरत सर्व अधिकारी, सल्लागार तज्ञ यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील एक गाव व जन्म गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी पुढाकार घेण्याचे निर्देश दिले आहे.