पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 05:00 AM2020-06-03T05:00:00+5:302020-06-03T05:00:19+5:30

दरवर्षी २६ जून रोजी शाळेचा ठोका वाजत असून नवीन शैक्षणिक सत्राची सुरूवात होते. यंदा कोरोनामुळे सर्वच काही विस्कळीत असून शाळी कधीपासून सुरू करायच्या हे सुद्धा आतापर्यंत ठरविण्यात आले नाही. मात्र शिक्षण क्षेत्रात हलगर्जीपणा चालणार नसून शाळा कधीही सुरू झाल्यातरी आपण सज्ज राहावे यादृष्टीने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने आपली तयारी सुरू केली आहे.

Books in the hands of students on the first day | पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके

पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके

Next
ठळक मुद्देशिक्षण विभागाचे नियोजन : ६ लाख पुस्तके वितरणाचा आराखडा तयार

कपिल केकत।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शाळेचा ठोका कधी वाजवायचा याबाबत निर्णय झालेला नाही. मात्र जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके देण्यासाठीचे नियोजन केले आहे. यांतर्गत जिल्ह्यातील एक लाख १७ हजार ९६४ विद्यार्थ्यांना सहा लाख दोन हजार ९७३ पुस्तकांच्या वितरणाचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
दरवर्षी २६ जून रोजी शाळेचा ठोका वाजत असून नवीन शैक्षणिक सत्राची सुरूवात होते. यंदा कोरोनामुळे सर्वच काही विस्कळीत असून शाळी कधीपासून सुरू करायच्या हे सुद्धा आतापर्यंत ठरविण्यात आले नाही. मात्र शिक्षण क्षेत्रात हलगर्जीपणा चालणार नसून शाळा कधीही सुरू झाल्यातरी आपण सज्ज राहावे यादृष्टीने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने आपली तयारी सुरू केली आहे. शासनाकडून वर्ग १ ते ८ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुस्तक दिल्या जात असून या पुस्तका विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी हाती पडावे यासाठी शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. यंदा जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांतील एक लाख १७ हजार ९६४ विद्यार्थ्यांसाठी सहा लाख दोन हजार ९७३ पुस्तकांची आवश्यकता आहे. शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना पुस्तक हाती पडल्यानंतर त्यांचा अभ्यास सुरू होणार व त्यांचे शाळेत जाण्यासाठी आकर्षणही वाढणार आहे. यामुळेच शिक्षण विभागाने शाळेची घंटा ज्या दिवशी वाजणार त्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके पडावी यादृष्टीने नियोजन केले आहे. ४ कर्मचाऱ्यांची यासाठी नियुक्ती केली असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजकुमार हिवारे यांनी दिली.

असा आहे पुस्तक वितरणाचा आराखडा
शिक्षणाधिकाऱ्यांनी विभागातील ४ कर्मचाºयांची पुस्तके आणून त्यांचे वितरण करण्यासाठी नियुक्ती केली आहे. यांतर्गत हे कर्मचारी १ ते १५ जूनदरम्यान नागपूर डेपो येथून जिल्ह्यातील मागणीनुसार सहा लाख दोन हजार ९७३ पुस्तकांचा साठा जिल्ह्यात आणून तालुकास्तरावर त्यांचे वितरण करणार आहे. त्यानंतर १६ ते २० जूनदरम्यान केंद्रप्रमुख आपापल्या शाळांमध्ये या पुस्तकांचे वितरण करून ठेवतील. अशात २६ जून रोजी शाळा सुरू झाल्यास त्याच दिवशी त्यांना पुस्तक हाती देता येणार असल्याचे हिवारे यांनी सांगीतले.
विद्यार्थ्यांना असते आकर्षण
शाळेचा पहिला दिवस त्यादिवशी नवे कोरे पुस्तक हाती आल्यास विद्यार्थ्यांचा उत्साह वाढतो. नव्या पुस्तकांचा वास घेत विद्यार्थी मोठ्या आनंदात शाळेत जातात. त्यांचा हा उत्साह वाढावा व शाळेप्रती आकर्षण निर्माण व्हावे यासाठीच शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तकांचा संच त्यांच्या हाती देण्याचे ठरविले आहे. जेणेकरून विद्यार्थी शाळेत यावेत त्यांची पटसंख्या कायम टिकून राहावी हा यामागचा उद्देश आहे.

Web Title: Books in the hands of students on the first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.