शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
2
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
3
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
4
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
5
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
6
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
7
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
8
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
9
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
10
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
11
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
12
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
13
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
14
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
15
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
16
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
17
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
19
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
20
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
Daily Top 2Weekly Top 5

महिलेची हत्या करून मृतदेह पुंजण्यात जाळला

By admin | Updated: November 17, 2014 22:55 IST

काटी, कासा येथील रहिवासी असलेल्या फुलवंता शिवचरण जमरे (४२) या महिलेची अज्ञात इसमांनी हत्या केली. यानंतर तिचा मृतदेह शेतातील धानाच्या पुंजण्यात जाळण्यात आला.

कासा येथील घटना : अंतर्गत वाद की अत्याचारानंतरचे कृत्य?रावणवाडी : काटी, कासा येथील रहिवासी असलेल्या फुलवंता शिवचरण जमरे (४२) या महिलेची अज्ञात इसमांनी हत्या केली. यानंतर तिचा मृतदेह शेतातील धानाच्या पुंजण्यात जाळण्यात आला. ही हत्या नेमकी कशातून घडली याचा उलगडा होऊ शकला नाही.मृतक फुलवंता काटी येथील आठवडी बाजारातून खरेदी करून परत घरी जात असताना सुखदास पांचे यांच्या शेतातील धानाच्या पुंजण्यात मारेकऱ्यांनी तिचा मृतदेह जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तिला जीवंत जाळले नसून गळा आवळून हत्या करण्यात आली आणि नंतर तिला जाळण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालात नमुद करण्यात आले आहे.प्राप्त माहितीनुसार, फुलवंता शिवचरण जमरे ही महिला रविवारी आठवडी बाजार करून काटी येथे घरी परत येत असताना कासा मार्गाच्या ४०० मिटर आत असलेल्या शेतात ही घटना घडली. शेतातील धानाच्या पुंजण्याला आग लागली असल्याचे पाहून पप्पू जमरे यांनी सुखदास पाचे यांना धानाच्या पुंजण्यात आग लागली असल्याची माहिती भ्रमणध्वनीवरून दिली. पाचे यांनी घटनास्थळी पोहोचून पुंजण्याची आग विझवण्यासाठी गोंदिया येथील अग्निशमन विभागाला पाचारण केले. सायंकाळी ७.३० ते ८ वाजताच्या दरम्यान अग्निशामक दल घटनास्थळी येऊन आग विझवण्याचा कामी लागले असता धानाच्या पुंजण्यात महिलेचे दोन पाय दिसले. त्यामुळे हे वार्ता पूर्ण गावात वाऱ्यासारखी पसरली. गावकरी घटनास्थळी गोळा झाले असता फुलवंता या महिलेचा तो मृतदेह असल्याचे काही जणांनी ओळखले. लगेच रावणवाडी पोलीस ठाण्यात ही माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक पि. निंबाळकर आपल्या ताफ्यासह घटनास्थळावर दाखल झाले.घटनास्थळावर फुलवंता जमरे हिची चप्पल, भाजीपाला, खाद्यतेल आणि इतर जीवनोपयोगी वस्तू घटनास्थळावर विखुरलेल्या स्वरूपात अस्तव्यस्त पडून होत्या. शेतात पूर्ण धानाचे सहा पुंजणे होते. काही धानाचे भारे खाली पडले होते. त्याच धानाचा भाऱ्यावर फुलवंताचे प्रेत ठेऊन जाळण्यात आले.मृत फुलवंताला एक मुलगा देवराज आणि एक मुलगी डिलेश्वरी आहे. या घटनेत महिलेचा तर मृत्यू झालाच मात्र सुखदास पाचे यांचेही ४० ते ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच रावणवाडी ठाण्याचे निरीक्षक यांनी या घटनेचा तपास करून आरोपींचा शोध लावण्यासाठी चार-चार कर्मचाऱ्यांची चमू गठीत करून मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक नखाते यांनी घटनास्थळी हजर होऊन घटनास्थळाचे निरीक्षण केले व तपासासाठी दिशानिर्देश दिले. (वार्ताहर)