शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
3
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
4
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
5
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
6
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
7
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
8
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
9
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
11
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
12
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
13
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
14
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
16
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
17
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
18
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
19
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
20
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

युरियाच्या कृत्रिम तुटवड्याने शेतकरी त्रस्त

By admin | Updated: September 18, 2014 23:37 IST

खरीप हंगामातील धानपिकाला सध्यस्थितीत रासायनिक खतांची आवश्यकता आहे. त्यातही धानावरील विविध रोगांवर आळा घालण्यासाठी व धानवाढीसाठी लाभ मिळत असल्याने युरियाची मागणी अधिक आहे.

गोंदिया : खरीप हंगामातील धानपिकाला सध्यस्थितीत रासायनिक खतांची आवश्यकता आहे. त्यातही धानावरील विविध रोगांवर आळा घालण्यासाठी व धानवाढीसाठी लाभ मिळत असल्याने युरियाची मागणी अधिक आहे. असे असतानाही मात्र युरियाचा तुटवडा दाखवून विक्रेते चढ्या दराने युरियाची विक्री करीत असल्याचे चित्र आहे. यातून शेतकऱ्यांची चांगलीच लूट होत असल्याने शेतकरी कचाट्यात आला आहे. कृषी विभाग मोठ्या प्रमाणात युरिया उपलब्ध असल्याचे सांगत असताना मात्र होत असलेली ही टंचाई डोक्यावरून जात आहे. खरीपात शेतकऱ्यांना रासायनिक खतांची अडचण भासू नये, म्हणून कृषी विभागाने युरिया खतांसाठी ३०,२०० मेट्रिक टन, डीएपी १,७०० मेट्रिक टन, एमओपी ३०० मेट्रिक टन, एसएसपी ६,९०० मेट्रिक टन व संयुक्त मिश्रखते मंजूर करण्यात आली. यापैकी युरियाचा २०,६५१.६ मेट्रिक टन साठा उपलब्ध झाला. डीएपीच्या २,१७०.२ व मिश्रखतांचा मिळून एकूण ५५ हजार ९७९.२५ मेट्रिक टन साठा जिल्ह्याला प्राप्त झाला. यापैकी ४९,१४१.३ मेट्रिक टन रासायनिक खत विक्री झाले. उपलब्ध साठ्यापैकी ६ हजार ८३७.९५ मेट्रिक टन रासायनिक खतांचा साठा अजुनही उपलब्ध आहे. यात २०० मेट्रिक टन युरिया आहे. युरियाचा साठा उपलब्ध असूनही कृत्रिम तुटवडा जिल्ह्यात झाला असल्याने मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील एकाही कृषी केंद्रावर युरिया दिसेनासा झाला आहे. सद्यस्थितीत २८५ रुपयांची खताची बॅग ५०० रुपयांपर्यंत विकली जात आहे. रासायनिक खत व किटकनाशक औषधी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. लागवडीच्या महिनाभरानंतर प्रत्येक खरीप हंगामात युरिया खताचा तुटवडा दिसून येतो. कृषी विभाग प्रत्येक हंगामात कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा तुटवडा होत नसल्याचे कागदोपत्री सांगत असले, तरी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच युरिया खताचे भाव अचानक गगनाला भिडल्याने हा कृत्रिम तुटवडा कसा होत आहे हे कळायला मात्र मार्ग नाही.