शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

सालईटोलात कृषी मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2016 01:56 IST

सिध्दार्थ शेतकरी मंडळ सालईटोला (बापूटोला) व कृषी विभाग सालेकसा यांच्या संयुक्त विद्यमाने सालईटोला...

शेतकऱ्यांची उपस्थिती : आधुनिक तंत्रज्ञानावर केले मार्गदर्शनसालेकसा : सिध्दार्थ शेतकरी मंडळ सालईटोला (बापूटोला) व कृषी विभाग सालेकसा यांच्या संयुक्त विद्यमाने सालईटोला येथे एक दिवसीय कृषी मेळावा आणि मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले. कृषी मेळाव्याचे उद्घाटन पं.स.सालेकसाचे सभापती हिरालाल फाफनवाडे यांनी केले. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत गांधीटोला येथील सरपंच रेखा टेकचंद फुंडे, प्रमुख अतिथी म्हणून माजी पं.स.सभापती तुकाराम बोहरे, उपसरपंच भुमेश्वर मेंढे, ग्रामसेवक एस.एस.रहांगडले, कृषी केंद्र संचालक गजानन राणे, राजू डोंगरे, देवराम चुटे, रमेश चुटे उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आत्मा गोंदियाचे प्रकल्प संचालक एच.एस.चव्हाण, उपसंचालक के.आर.सराफ, सालेकसाचे तालुका कृषी अधिकारी जी.जी.तोडसाम, विज्ञान केंद्र हिवराचे समन्वयक नौलाखे, सालेकसाचे पशु संवर्धन अधिकारी व्ही.झेड. कोटांगले उपस्थित होते. प्रास्ताविक सेवानिवृत्त मुख्याध्यापकानी मांडले. कृषी मेळाव्याचे महत्व सांगीतले. याप्रसंगी प्रकल्प संचालक एच.एस.चव्हाण यांनी नगदी पिकांची शेती कशी करावी यावर सविस्तर मार्गदर्शन केले. शेतकऱ्याचा आर्थिक दर्जा उंचावण्यासाठी आधुनिक शेतीचे तंत्र कोणते यावर मार्गदर्शन केले. के.आर.सराफ यांनी पिकाची देखभाल व निगा कशी राखावी या बद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान काही शेतकऱ्यांनी आपल्या अनेक अडचणी मांडल्या. त्यावर उपाययोजना कोणत्या कराव्यात याबद्दल मेळाव्यात चर्चा करण्यात आली. माजी सभापती तुकाराम बोहरे यांनी ही कृषीचा विकास साधण्यासाठी कोण-कोणती काळजी घ्यावी आणि कशी जमीनीची मशागत करावी याबद्दल मार्गदर्शन केले.संचालन व आभार पवन पाथोडे यांनी केले. कार्यक्रमाला तालुक्यातील अनेक गावातील नागरिक उपस्थित होते. मार्गदर्शन मेळाव्यातून घेतलेल्या मार्गदर्शनातून शेतीचा विकास करण्याचा माणस शेतकऱ्यांनी बांधला. यशस्वीतेसाठी सिध्दार्थ शेतकरी मंडळाचे अध्यक्ष पार्थसिंह बैस, उपाध्यक्ष मुकेश शेंडे, सचिव के.जी.उके, जेठमल फटीक, देवकुमार शेंडे, यादोराव उके, युवराज फटीक, दुलीचंद सोनकवरे, अशोक चुटे, मोहनसिंग कनपुरीया, उत्तमजी औरासे, शंकर लोधे तसेच महिला बचत गट आणि पुरूष बचत गटाचे सदस्यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)