गोंदिया : दिगंबर जैन संत आचार्य १०८ विशुद्धसागर महाराज यांचे सोमवारी (दि.२८) सकाळी ८.३० वाजता गोंदिया शहरात आगमन होत आहे. रविवारी दुपारी ४ वाजता महाराष्ट्र सीमेत त्यांनी प्रवेश केला. त्यांचे स्वागत जैन समाजबांधवांनी केले. जनकराज गुप्ता यांच्या निवासस्थानी समाज बांधवांनी सकाळी ८.३० वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या सीमेवर आगमनाच्यावेळी स्वागत करण्यासाठी आ. राजेंद्र जैन, विनोद जैन, सुकमाल जैन, अशोक जैन, राजू जैन, राजेश जैन, देवेंद्र अजमेरा, सुधीर जैन, सुनील जैन, दिलीप ठोल्या, अजयकुमार जैन, संतोष जैन, रवि कासलीवाल, धनेंद्र जैन व इतर समाजबांधव उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}