शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

२६२ प्रेमवीरांचे घडविले शुभमंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2016 01:47 IST

जातीयवादाला थारा न देता सर्वधर्म समभावाची संकल्पना साकारण्यासाठी जिल्ह्यातील महात्मा गांधी तंटामुक्त गाव

नरेश रहिले ल्ल गोंदियाजातीयवादाला थारा न देता सर्वधर्म समभावाची संकल्पना साकारण्यासाठी जिल्ह्यातील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी पुढाकार घेतला आहे. ही मोहीम सुरू झाल्यापासून आजपर्यंत समित्यांनी जिल्ह्यात १७० आंतरजातीय तर ९२ प्रेमविवाह घडवून आणले. जिल्ह्यातील १६ पोलीस ठाण्यांतर्गत ५५६ महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्या असून या समित्यांनी आंतरजातीय व प्रेमविवाह घडवून आणले. गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तंटामुक्त समित्यांनी ११ आंतरजातीय विवाह घडवून आणले. गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तंटामुक्त समित्यांनी ६ आंतरजातीय तर ६ प्रेमविवाह घडवून आणले. रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तंटामुक्त समित्यांनी ३ आंतरजातीय आणि ५ प्रेमविवाह घडवून आणले. तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तंटामुक्त समित्यांनी ९ आंतरजातीय तर ५ प्रेमविवाह घडवून आणले. गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तंटामुक्त समित्यांनी ७ प्रेमविवाह घडवून आणले. दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत तंटामुक्त समित्यांनी ६ आंतरजातीय तर ६ प्रेमविवाह घडवून आणले आहेत.आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तंटामुक्त समित्यांनी ८ आंतरजातीय घडवून आणले. सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तंटामुक्त समित्यांनी ३० आंतरजातीय तर २० प्रेमविवाह घडवून आणले. अविकसित आणि नक्षलग्रस्त असताना सुद्धा या भागात झालेले हे आंतरजातीय विवाह कौतुकास्पद ठरत आहे.गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तंटामुक्त समित्यांनी ११ आंतरजातीय तर ५ प्रेमविवाह घडवून आणले. देवरी पोलीस ठाण्यांतर्गत तंटामुक्त समित्यांनी ८ प्रेमविवाह घडवून आणले. चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तंटामुक्त समित्यांनी ६ आंतरजातीय तर ८ प्रेमविवाह घडवून आणले. अर्जुनी/मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तंटामुक्त समित्यांनी १६ आंतरजातीय तर २ प्रेमविवाह घडवून आणला. केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत तंटामुक्त समित्यांनी ४ आंतरजातीय तर ९ प्रेमविवाह घडवून आणले. नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तंटामुक्त समित्यांनी ५ आंतरजातीय तर ७ प्रेमविवाह घडवून आणले. डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत ४९ आंतरजातीय विवाह घडवून आणण्यात तंटामुक्त गाव समित्यांना यश आले आहे.जिल्ह्यात एकूण १७० आंतरजातीय तर ९२ प्रेमविवाह समित्यांनी घडवून आणले. या विवाहांना सुरूवातीला मुलगा व मुलगी यांच्या नातेवाईकांचा तीव्र विरोध असायचा. मात्र तंटामुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे समुपदेशन केले आणि कुठे आई-वडिलांच्या संमतीने तर कुठे त्यांच्या विरोधाला न जुमानता सज्ञान प्रेमी युगलांचे विवाह लावून दिले.असे केले सामाजिक कार्य४राज्य शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडविण्याबरोबर जातीय सलोखा कायम राखणे, अंधश्रध्दा निर्मूलन करणे, स्त्री भू्रणहत्येवर आळा घालणे, महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणे, वृक्षारोपण करणे व गावाच्या विकासासाठी सण, उत्सव, मेळावे पोलीस बंदोबस्ताशिवाय शांततेत पार पाडणे, महापुरूषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या शांततेत पार पाडण्यासाठी समित्यांनी प्रयत्न केले. इतकेच नाही तर जातीय बंधनांना झुगारून गावात आंतरजातीय विवाहाचा पायंडा तंटामुक्त समित्यांनी घातला.