शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गोवा सरकारच्या आर्थिक धोरणांवर काँग्रेसचा  हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 13:18 IST

रस्ता करात ३ महिन्यांसाठी ५० टक्क्यांच्या कपातीच्या घोषणेला आक्षेप 

पणजी :  रस्ता करात ५० टक्के कपात केल्याने त्याचा लोकांना फायदा होईल असे भासवण्याचा प्रयत्न करुन सरकार जनतेची दिशाभूल करत आहे. भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आज जनतेकडे नवीन वाहन विकत घेण्यासाठी आर्थिक शक्तिच राहिली नसल्याचे सांगून, कर कपातीची घोषणा ही निव्वळ धूळफेक असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष  गिरीश  चोडणकर यानी म्हटले आहे.अर्थ खात्याच्या अखत्यारित येणाऱ्या आर्थिक निर्णयाची घोषणा वाहतूकमंत्री कशी काय करु शकतात, असा सवाल करत त्यांनी माविन गुदिन्हो हे भरकटलेल्या भाजप सरकारचे नवे अर्थमंत्री आहेत का असा प्रश्न मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना विचारला आहे. चुकीची धोरणे व बडेजाव यामुळे डबघाईस आलेली देश व राज्याची अर्थव्यवस्था सांभाळण्याची कसरत करत असताना आता प्रत्येक दिवशी नवीन अर्थसंकल्प सादर होणार का, याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणी चोडणकर यानी केली आहे.  भाजप केडरमध्ये आरएसएसची ध्येय धोरणे व तत्वप्रणाली असते असे विधान भाजपचे खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यानी मडगावात केले होते. त्याचा समाचार घेताना  चोडणकर यांनी गोवा विधानसभेत संमत झालेल्या अर्थसंकल्पाला फाटा देऊन केलेल्या आर्थिक घोषणा या संघाच्या 'अर्थशास्त्रा' प्रमाणे आहेत का, असा प्रश्न विचारला. केंद्र व राज्य सरकारच्या भरकटलेल्या धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आली असून, जनतेला आज दैनंदिन खर्च भागवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. तात्पुरत्या घोषणा करण्यापेक्षा सरकारने दूरगामी विचार करुन अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी प्रयत्न करावेत, नपेक्षा खुर्ची सोडावी, अशी मागणी चोडणकर यानी केली आहे. भारतीय रिजर्व बॅंकेचे १.७४ लाख कोटी रुपये मोदी सरकारने घेतल्याचा परिणाम म्हणूनच आज देशातल्या बँका एका मागोमाग एक दिवाळखोरी जाहीर करत असल्याचे चोडणकर यांनी म्हटले. लोकांना आज बँकेत पैसे ठेवणे असुरक्षित वाटत असून, घरात पैसे ठेवायचा विचार केल्यास नोटाबंदीचे भूत समोर दिसते. भाजप सरकारने जनतेचा मानसिक छळ चालवला असून लोकांचे शाप भाजपाला लागणार आहेत, असे चोडणकर म्हणाले. केवळ पंतप्रधान मोदींचा व्यक्तिगत सोस पुरविण्यासाठी लाखो कोटी खर्च करून देश परदेशात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, टेलिप्राऊंटरवरची भाषणे वाचण्याचे व फोटो काढून घेण्याचे व्यसन मोदींना लागले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीचे नाव घेऊन लोकांना तत्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या पंतप्रधान मोदींनी अनेकवेळा त्यांचा मोहनलाल असा उल्लेख करुन अपमान केला  आहे, असे चोडणकर पुढे म्हणाले. 

टॅग्स :goaगोवा