'बिट्स पिलानी'च्या आणखी एकाने जीवन संपवले; १७ महिन्यांत सातव्या विद्यार्थ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 12:26 IST2026-05-14T12:26:39+5:302026-05-14T12:26:49+5:30

मृतदेहाजवळ मिळाली 'सुसाइड नोट'; पोलिसांकडून कारणांचा शोध सुरू, प्रशासन सतर्क

another student in BITS Pilani life ends seventh student dies in 17 months | 'बिट्स पिलानी'च्या आणखी एकाने जीवन संपवले; १७ महिन्यांत सातव्या विद्यार्थ्याचा मृत्यू

'बिट्स पिलानी'च्या आणखी एकाने जीवन संपवले; १७ महिन्यांत सातव्या विद्यार्थ्याचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को: सांकवाळ येथील बिट्स पिलानी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मूळ केरळच्या २६ वर्षीय अर्जुन साबू या विद्यार्थ्यांने तेर्णा येथे भाड्याने राहत असलेल्या फ्लॅटमध्ये गळफास लावून घेत आत्महत्या केली. या विद्यार्थ्याच्या मृतदेहाजवळ वेर्णा पोलिसांना 'सुसाइड नोट' सापडली. बिट्स पिलानी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या मृत्यूची ही गेल्या १७ महिन्यांतील ७ वी घटना आहे. या प्रकाराने विद्यार्थी, शिक्षक, पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

वेर्णा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी ११.३० वाजता अर्जुन साबू याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. मूळ केरळ येथील अर्जुन हा बिट्स पिलानी कॉलेजमध्ये 'पीएच.डी.च्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होता. तो वेर्णा येथील एका इमारतीतील फ्लॅटमध्ये भाड्याने राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याने भाड्याने राहत असलेल्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. अर्जुन याने गळफास लावून घेतल्याचे दिसले.

पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अर्जुनने मंगळवारी रात्री आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. त्याच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली असून लवकरच ते गोव्यात येतील, असे पोलिसांनी सांगितले.

जिल्हा प्रशासनाने सांगितले की, २४ एप्रिल रोजी आढावा बैठकीत कॅम्पसच्या डीनने समितीला जिल्हास्तरीय देखरेख समितीने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी केली आहे, अशी माहिती दिली. संस्थेने २४०७ मानसिक आरोग्य सहाय्यता सुविधा स्थापन केली आहे, असे सांगण्यात आले.

१७ महिन्यांत सातव्या विद्यार्थ्याचा मृत्यू

गेल्या १७ महिन्यांत बिट्स पिलानी कॉलेजमधील सात विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. यापैकी तीन घटनांत तिघांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. डिसेंबर २०२४ मध्ये एका विद्यार्थ्याने तर मार्च २०२५ मध्ये अन्य एका विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. मे २०२५ मध्ये तिसऱ्या विद्यार्थ्यांने आत्महत्या केली. १६ ऑगस्ट २०२५ ला कुशाग्र जैन हा विद्यार्थी मृतावस्थेत आढळला होता. तर ४ सप्टेंबर २०२५ रोजी ऋषी नायर याचाही संशयास्पद मृत्यू झाला. अलीकडेच, १ फेब्रुवारी रोजी रात्री वैष्णवी जितेश हिने गळफास लावून आत्महत्या केली होती.

आत्महत्यांच्या घटना रोखण्याचे प्रयत्न : जिल्हाधिकारी क्लिट्स

'अर्जुन साबू याच्या मृतदेहाची शवचिकित्सा केल्यानंतर तपासात त्याच्या मृत्यूमागचे नेमके कारण उघड होईल' असे दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अॅग्ना क्लिट्स यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, या कॉलेजमधील विद्यार्थी आत्महत्येची ही चालू वर्षातील दुसरी घटना आहे. पहिल्या घटनेवेळी विद्यार्थी आत्महत्येची कारणे शोधण्यासाठी पोलिस, जिल्हा पातळीवरील नियुक्त समितीसह सरकारी अधिकाऱ्यांनी बिट्स पिलानी कॉलेज कॅम्पसला भेट देऊन पाहणी केली. त्याचा अहवाल फेब्रुवारी महिन्यात सरकारला पाठवला आहे. 

विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत बदलासाठी काय पावले उचलवावीत याच्या सूचना कॉलेजला केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी कॉलेजने केली आहे. पूर्वी कॉलेजमध्ये पुरेशा मानसिक आरोग्य सुविधा, मानसिक आरोग्य तज्ज्ञांची पुरेशी संख्या नव्हती. आता कॉलेजने सुविधा वाढवून तज्ज्ञ उपलब्ध केले. शैक्षणिक ताण कमी करण्यासाठी काही परीक्षा बंद करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. कॉलेजकडून उपाय केले जात आहेत. सरकारी पातळीवर आणखी उपाययोजना करू असे क्लिट्स म्हणाल्या.
 

Web Title : बिट्स पिलानी में छात्र आत्महत्या: सत्रह महीनों में सातवीं मौत

Web Summary : गोवा में बिट्स पिलानी के एक और छात्र ने आत्महत्या की, जो 17 महीनों में ऐसी सातवीं घटना है। अधिकारी जांच कर रहे हैं, मानसिक स्वास्थ्य संबंधी चिंताओं और कॉलेज के भीतर सहायता प्रणालियों को बेहतर बनाने के चल रहे प्रयासों का हवाला दे रहे हैं।

Web Title : BITS Pilani Student Suicide: Seventh Death in Seventeen Months

Web Summary : Another BITS Pilani student in Goa died by suicide, marking the seventh such incident in 17 months. Authorities are investigating, citing mental health concerns and ongoing efforts to improve support systems within the college.