शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
5
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
6
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
7
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
8
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
9
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
10
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
11
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
12
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
13
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
15
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
16
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
17
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
18
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
19
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
20
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
Daily Top 2Weekly Top 5

एसटीची चाके आता येताहेत रुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 05:00 IST

राज्य शासनाने शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला असून प्रत्येक शनिवारी व रविवारी सुटी दिली आहे. दाेन दिवस शासकीय कार्यालये बंद राहतात. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक तालुकास्थळी येत नाही. तसेच शासकीय कर्मचारीही प्रवास करीत नसल्याने हे दाेन दिवस एसटीला पूर्वीच्या तुलनेत कमी प्रमाणात प्रवासी मिळत नसल्याचे दिसून येत आहे. शाळा सुरू झाल्या असल्या तरी काही विद्यार्थी शाळेत अनुपस्थित आहेत. तसेच महाविद्यालये बंद आहेत.

ठळक मुद्देपूर्ण क्षमतेने बसफेऱ्या सुरू, ग्रामीण भागातही पाेहाेचत आहे एसटी

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : काेराेनाचा प्रभाव कमी हाेताच गडचिराेली आगारातून पूर्ण क्षमतेने बसेस साेडल्या जात आहेत. त्यामुळे प्रवाशांची साेय हाेण्याबराेबरच एसटीलाही उत्पन्न मिळत आहे. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी जवळपास तीन महिने एसटीची सेवा बंद ठेवण्यात आली हाेती. त्यानंतर काही अटी व शर्ती घालून बससेवा सुरू करण्यात आली. मात्र लाॅकडाऊन कायम असल्याने तसेच काेराेनाची भीती नागरिकांमध्ये कायम असल्याने नागरिक बसमध्ये बसत नव्हते. परिणामी एसटी आगाराकडून कमी प्रमाणात बसेस साेडल्या जात हाेत्या.  काेराेनाचा  प्रभाव कमी झाल्यानंतर आता एसटी गाड्यांची संख्या वाढविण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

दर दिवशी ७.५ लाखांचे उत्पन्नगडचिराेली आगारात एकूण १०३ बसेस आहेत. त्यातील ४९ बसेस मानव विकास मिशनच्या आहेत. सर्वच मार्गांवर आता बसेस सुरू आहेत. दर दिवशी ३४ हजार किमी बसेस चालतात. त्यातून ७ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. बसफेऱ्या पूर्वीएवढ्याच साेडण्यात येत असल्या तरी उत्पन्न मात्र कमी मिळत आहे. 

शनिवार, रविवारच्या सुटीचा फटका

राज्य शासनाने शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला असून प्रत्येक शनिवारी व रविवारी सुटी दिली आहे. दाेन दिवस शासकीय कार्यालये बंद राहतात. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक तालुकास्थळी येत नाही. तसेच शासकीय कर्मचारीही प्रवास करीत नसल्याने हे दाेन दिवस एसटीला पूर्वीच्या तुलनेत कमी प्रमाणात प्रवासी मिळत नसल्याचे दिसून येत आहे. शाळा सुरू झाल्या असल्या तरी काही विद्यार्थी शाळेत अनुपस्थित आहेत. तसेच महाविद्यालये बंद आहेत. या सर्व कारणांमुळे बसचे प्रवासी कमी झाले आहेत. याचा माेठा फटका एसटी महामंडळाला बसत आहे. सरासरी ४० एवढे भारमान मिळत आहे.

मागील १५ दिवसांपासून  जिल्ह्यातील सर्वच मार्गांवर बसेस नियमित सुरू झाल्या आहेत. तसेच नांदेड, गाेंदियाा, मानपूर, चिमूर, उमरखेड या लांब पल्ल्याच्या बसेसही सुरू झाल्या आहेत. पूर्वीएवढ्याच बसफेऱ्या सुरू आहेत. मात्र आता प्रवासी कमी प्रमाणात  मिळत आहेत. प्रवाशांची संख्या वाढेल, अशी अपेक्षा आहे.मंगेश पांडे, एसटी आगारप्रमुख, गडचिराेली

टॅग्स :state transportएसटी