शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

चार हजार रोहयो मजुरांना व्यवसायाचे प्रशिक्षण

By admin | Updated: August 28, 2016 01:28 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामावर १०० दिवसांचे काम पूर्ण करणाऱ्या जिल्हाभरातील चार हजार चार मजुरांना

स्वयंरोजगार मिळणार : आरसेटी संस्थेचा उपक्रमगडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामावर १०० दिवसांचे काम पूर्ण करणाऱ्या जिल्हाभरातील चार हजार चार मजुरांना बँक आॅफ इंडिया स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था गडचिरोली (आरसेटी) च्या वतीने व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. या मजुरांची यादी वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आली आहे. ग्रामीण भागातील रोजगाराची समस्या दूर करण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या वतीने केले जात आहे. या कामावर येणारा बहुतांश मजूर वर्ग अशिक्षीत, अल्पशिक्षीत असून अकुशल आहे. यातील काही मजूर दरवर्षी १०० पेक्षा अधिक दिवस रोजगार हमी योजनेचे काम करीत आहेत. यावरून सदर मजूर काही तरी करण्याच्या मनस्थितीत असल्याचे दिसून येते. या मजुरांना व्यवसायाचे प्रशिक्षण दिल्यास सदर मजूर चांगल्या पध्दतीने व्यवसाय सुध्दा करू शकतील, अशी अपेक्षा केंद्र शासनाची आहे. त्यामुळे अशा मजुरांना अल्पमुदतीचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. सदर प्रशिक्षण देण्याची जबाबदारी संबंधित जिल्ह्यातील लीड बँकेवर देण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात लीड बँकेचे काम बँक आॅफ इंडिया करीत आहे. या संस्थेच्या वतीने १०० दिवसांचे रोहयो काम पूर्ण करणाऱ्या मजुरांची माहिती गोळा करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात सुमारे चार हजार चार मजुरांनी १०० दिवसांचे रोहयो काम पूर्ण केले आहे. या मजुरांची यादी ग्रामीण विकास मंत्रालयाकडे पाठविण्यात आली आहे. या मजुरांना विविध व्यवसायांबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. चार हजार चार मजुरांना एकाच वेळी प्रशिक्षण देणे शक्य नसल्याने दरवर्षी काही बॅचेस पाडून सदर प्रशिक्षण दिले जाणार आहे. रोहयोचे काम अकुशल आहे. सदर मजुराला प्रशिक्षण दिल्यास तो मजूर स्वत:चा रोजगार सुरू करेल. त्याला रोजगार मिळाल्यानंतर त्याच्याच व्यवसायाच्या माध्यमातून इतर व्यक्तींनाही रोजगार प्राप्त होईल. त्याचबरोबर अकुशल रोहयो मजूर कुशल होण्यास मदत होणार आहे. (नगर प्रतिनिधी)चिंगलीतील मजुरांना प्रशिक्षण मिळाले१०० दिवसांचे रोहयो काम पूर्ण करण्यात इतर तालुक्यांच्या तुलनेत धानोरा तालुका आघाडीवर आहे. या तालुक्यातील १ हजार २२८ रोहयो मजुरांची नावे प्रशिक्षणासाठी वरिष्ठस्तरावर पाठविण्यात आली आहेत. धानोरा तालुक्यातील चिंगली येथील ३१ रोहयो मजुरांना बकरीपालनाचे प्रशिक्षण सुध्दा देण्यात आले आहे. त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आरसेटीचे अधिकारी प्रयत्नशील आहेत. याच पध्दतीने टप्प्याटप्प्याने इतरही रोहयो मजुरांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.