शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

नर्सेसच्या तीन मागण्या मंजूर

By admin | Updated: December 21, 2015 01:35 IST

परिचारिका व अंशकालीन स्त्री परिचर यांच्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य ...

उपोषणाची सांगता : नर्सेसची अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चागडचिरोली : परिचारिका व अंशकालीन स्त्री परिचर यांच्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य जि.प. नर्सेस संघटनेच्या वतीने १४ डिसेंबरपासून जिल्हा परिषद समोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. दरम्यान, १६ व १८ डिसेंबर रोजी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता व उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून तीन मागण्या मंजूर केल्या. त्यामुळे नर्सेसचे सदर आमरण उपोषण तुर्तास स्थगित करण्यात आले आहे.एएनएम व एलएचव्ही पदावर असलेल्या २१४ नर्सेसला नियमित करण्यात आले. १८४ नर्सेसला स्थायी करण्यात आले असून नर्सेसच्या कालबध्द पदोन्नतीचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली. सदर तीन मागण्या मंजूर झाल्या आहेत. यापुढील मागण्या मंजूर न केल्यास ४ जानेवारी २०१६ पासून विभागीय आयुक्त नागपूर यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा नर्सेस संघटनेचे अध्यक्ष माया सिरसाट, कल्पना रामटेके, मंदा आंबेकर, पाझारे, वंदना भारती यांनी दिली आहे. चर्चेदरम्यान जि.प. कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, जिल्हाध्यक्ष रतन शेंडे, दीपक चौधरी व नर्सेस उपस्थित होत्या. शुक्रवारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक व सहायक आरोग्य अधिकारी डॉ. वाघ यांनी उपोषणकर्त्यांना लिंबूपाणी पाजून उपोषणाची सांगता केली. (प्रतिनिधी)