शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचे वर्ग व शाळेचे व्यवस्थापन एकाच खाेलीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 05:00 IST

प्राथमिक शिक्षण हा बालकांच्या विकासाचा पाया आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षणापासूनच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास हाेणे गरजेचे आहे. यासाठी शिक्षकांनी वर्गांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना अधिकाधिक वेळ अध्यापन करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने शाळांमध्ये वर्गखाेली, मुख्याध्यापक कक्ष, स्टाफरूम, वाचनालय, प्रसाधनगृह, क्रीडांगण व इतर सुविधा असणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या केवळ ३२ शाळांमध्येच स्टाफरूम

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : गडचिराेली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या जवळपास एक हजार ५५० प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा आहेत. या शाळांपैकी जवळपास ३५० शाळांमध्ये मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र कक्ष नाही. त्यामुळे मुख्याध्यापक आपले प्रशासकीय काम विद्यार्थ्यांच्या वर्गखाेलीतच बसून करतात.  जि. प.च्या केवळ ३२ शाळांमध्येच स्टाफरूम आहे, इतर शाळांमध्ये स्टाफरूम नाही. त्यामुळे अध्ययन व अध्यापनाचे कार्य प्रभावित हाेते. प्राथमिक शिक्षण हा बालकांच्या विकासाचा पाया आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षणापासूनच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास हाेणे गरजेचे आहे. यासाठी शिक्षकांनी वर्गांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना अधिकाधिक वेळ अध्यापन करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने शाळांमध्ये वर्गखाेली, मुख्याध्यापक कक्ष, स्टाफरूम, वाचनालय, प्रसाधनगृह, क्रीडांगण व इतर सुविधा असणे आवश्यक आहे. मात्र, अहेरी उपविभाग व काेरची, कुरखेडा, धानाेरा तालुक्यांतील बऱ्याच जि. प. शाळांमध्ये अनेक भाैतिक सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे अध्ययन व अध्यापन कार्यात व्यत्यय येत असून, शिक्षक व विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. जिल्हा परिषदेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

शिक्षकांची हाेते दमछाककाेराेना महामारीची समस्या आटाेक्यात आल्यानंतर पहिल्या टप्प्यात इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पाचवी ते आठवीचे वर्ग प्रत्यक्ष भरविले जात आहेत. सध्या इयत्ता पहिली ते चाैथीचे वर्ग प्रत्यक्ष बंदच आहेत. येथे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. दुर्गम व अतिदुर्गम भागातील जि. प. शाळांमध्ये पुरेशा वर्गखाेल्या नाहीत, मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र कक्ष नाही. स्टाफरूमचा पत्ता नाही. त्यामुळे शाळेचे विविध साहित्य, दस्तावेज, फर्निचर एका वर्गखाेलीतच काेपऱ्याला ठेवावे लागते. या खाेलीत अध्यापनाचे काम केले जाते.  पुरेशा भाैतिक सुविधांअभावी दुर्गम भागातील शाळांचे शिक्षक व मुख्याध्यापक त्रस्त झाले आहेत. 

या शाळांमध्ये स्टाफरूमची व्यवस्थागडचिराेली जिल्ह्यात जिल्हा परिषदेंतर्गत १० माध्यमिक शाळा आहेत. याशिवाय पाच ठिकाणी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालये आहेत. तसेच इतर माेठ्या शाळा मिळून एकूण ३२ ठिकाणी स्टाफरूमची व्यवस्था आहे. इतर शाळांमध्ये स्टाफरूमचा पत्ता नाही.

 

टॅग्स :Schoolशाळा