शहरं
Join us  
Trending Stories
1
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
2
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
3
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
4
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
5
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
6
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
7
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
8
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
9
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
10
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
11
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
12
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
13
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
14
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
15
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
16
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
17
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
18
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
19
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
20
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांना म्हणाल्या, ‘अच्छा हुआ आप आये...’; पतीच्या आत्मसमर्पणाने ‘तारक्का’ झाल्या भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 08:43 IST

उभी हयात चळवळीत घालवलेल्या विमला सिडाम उर्फ तारक्कासह भूपतीने १५ ऑक्टोबरला नव्या आयुष्याच्या दिशेने पाऊल ठेवले. मुख्यमंत्र्यांसमोर जाताच तारक्काने ‘अच्छा हुआ आप आये...’ असे म्हणत आभार मानले. मुख्यमंत्र्यांनी दोघांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. 

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : नक्षवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य व जहाल नेता मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनूच्या आत्मसमर्पणाचा सर्वाधिक आनंद पत्नी विमला सिडाम उर्फ तारक्काला झाला. १ जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर तारक्काने आत्मसमर्पण केले होते. पाठोपाठ पतीनेही शस्त्र सोडल्याने त्या सुखावल्या. भूपतीच्या आत्मसमर्पणावेळी मुख्यमंत्र्यांनी खास ताराक्का यांना मंचावर बोलावले. तेव्हा मुख्यमंत्र्यांसाठी आणलेल्या पुष्पगुच्छाने मुख्यमंत्र्यांनीच या जोडीचा सत्कार केला.

उभी हयात चळवळीत घालवलेल्या विमला सिडाम उर्फ तारक्कासह भूपतीने १५ ऑक्टोबरला नव्या आयुष्याच्या दिशेने पाऊल ठेवले. मुख्यमंत्र्यांसमोर जाताच तारक्काने ‘अच्छा हुआ आप आये...’ असे म्हणत आभार मानले. मुख्यमंत्र्यांनी दोघांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. 

डोळे अश्रूंनी भरले कार्यक्रमाच्या ठिकाणी तारक्काचे डोळे अश्रूंनी भरले होते, तर भूपतीच्या चेहऱ्यावरही हास्य ओसंडून वाहात होते. मंचावर आगमन होताच भूपतीने हसत हसत फडणवीस यांच्या हाती एके-४७ बंदूक सोपविली. मुख्यमंत्र्यांनी त्याच्या हातातील शस्त्र घेतले व त्याला संविधान भेट दिले.

नवजीवनाची संधी फक्त संविधानातून : मुख्यमंत्री  मुख्यमंत्री म्हणाले,  या आत्मसमर्पणाने गडचिरोलीतून एक सकारात्मक संदेश पसरतोय, हिंसाचाराचा मार्ग सोडून, प्रत्येकाला नव्या जीवनाची संधी मिळते, ही संधी बंदुकीच्या जोरावर नाही तर संविधानातूनच मिळते. भूपतीने मुख्यमंत्र्यांसमोरच आत्मसमर्पण करेन, अशी अट सुरक्षा यंत्रणेला ठेवली होती, अशी माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना याची पुष्टी दिली. भूपती शस्त्र सोडत असेल तर माझी जंगलात जाण्याचीही तयारी होती, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Naxal Leader Surrenders; Wife Overjoyed, Thanks Chief Minister for Arrival.

Web Summary : Naxal leader Bhupati surrendered before Chief Minister Fadnavis, delighting his wife, Tarakka, who had previously surrendered. Tarakka thanked the CM, who honored the couple. Bhupati surrendered his AK-47, receiving the Constitution in return. The CM emphasized new beginnings are possible through the Constitution.
टॅग्स :naxaliteनक्षलवादीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस