शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

नवख्या उमेदवारांची झाली गर्दी

By admin | Updated: September 29, 2014 00:45 IST

गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, अहेरी, गडचिरोली या तीन विधानसभा मतदार संघात यावेळी अनेक नवखे उमेदवार मैदानात उतरले आहेत. ज्यांचे नावही आजवर कधीतरीच ऐकले असतील,

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, अहेरी, गडचिरोली या तीन विधानसभा मतदार संघात यावेळी अनेक नवखे उमेदवार मैदानात उतरले आहेत. ज्यांचे नावही आजवर कधीतरीच ऐकले असतील, अशाही उमेदवारांनी यंदा उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. त्यामुळे हे नवखे उमेदवार चर्चेचा विषय मतदार व राजकीय वर्तुळातही आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रातून भारतीय जनता पक्षाने क्रिष्णा दामाजी गजबे यांना उमेदवारी दिली आहे. गजबे यांचे नाव बऱ्याच मतदारांनी पहिल्यांदाच ऐकले आहे. देसाईगंज तालुक्यातील पोटगाव ग्रामपंचायतचे ते सरपंच आहेत. भारतीय जनता पक्षाचे निष्टावान नेतृत्व असलेले नाकाडे परिवाराचे कौंटुंबिक सदस्य अशीही गजबे यांची ओळख आहे. असाच नवखा चेहरा राष्ट्रवादी काँग्रेसने नारायण वटी यांच्या रूपाने उतरविला आहे. नारायण वटी हे सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी आहेत. ते ही राजकारणात पहिल्यांदाच पदार्पण करीत आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र चंदेल यांचे बंधू जयेंद्र चंदेल गेल्या आठ दिवसात चर्चेत आले. आजवर अनेकांना याची माहितीही नव्हती. त्यांचाही उमेदवारी अर्ज या मतदार संघात दाखल झाला आहे. अ‍ॅड. प्रतापशहा मडावी हे ही एक नवखे उमेदवार मैदानात उतरले आहेत. त्यांचे वडील हे सेवानिवृत्त न्यायाधीश असल्याचे सांगण्यात येत आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे उमेदवार मुक्तेश्वर गावडे हे परिचीत आहेत. मात्र जिल्ह्याच्या इतर भागातील अनेकांसाठी गावडे हे नवखेच आहेत. गावडे हे एटापल्ली तालुक्यातून जिल्हा परिषदेचे सदस्य होते. माजी खासदार नरेश पुगलिया यांचे ते खास समर्थक आहेत. राजकारणातील मृदुभाषिक चेहरा अशी गावडेंची ओळख आहे. त्यांनी एकट्यांनीच पक्षाकडे उमेदवारीसाठी मुलाखत दिली होती. गडचिरोली विधानसभा क्षेत्रातही अनेक नवीन चेहरे यावेळी मैदानात दिसत आहे. मनसेकडून रंजीता कोडाप हा नवा चेहरा मैदानात आहे. डॉ. देवीदास मडावी, महाराष्ट्र ग्राम विकास आंदोलनाच्यावतीने जयश्री वेळदा, मोरेश्वर किलनाके आदी अगदीच नवे उमेदवार नामांकन पत्र दाखल करून आहेत. यांनी यापूर्वीही कधी निवडणूक लढविल्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी अशी त्यांची कोरी पाटी आहे. या सोबतच तीनही विधानसभा क्षेत्राचा विचार करता काही जुने मुरब्बीही व अनेक निवडणुकात मैदानात लढलेले उमेदवारही रिंगणात आहेत. यामध्ये शिवसेनेचे डॉ. रामकृष्ण मडावी, काँग्रेसचे आनंदराव गेडाम, अपक्ष नंदू नरोटे, जयदेव मानकर, रामसुराम काटेंगे कोरची यांचा समावेश आहे. अहेरी क्षेत्रात धर्मरावबाबा आत्राम, मुतन्ना पेंदाम, आमदार दीपक आत्राम, कैलाश कोरेत, प्रभुदास आत्राम, रामेश्वर आत्राम, दिनेश मडावी यांचा समावेश आहे. प्रभुदास आत्राम यापूर्वी वनखात्यात नोकरीला होते. त्यांनी २०१२ मध्ये सिरोंचा तालुक्यातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली. तर रामेश्वर जगन्नाथराव आत्राम हे अहेरीचे माजी सरपंच आहेत. ते उत्कृष्ट क्रिकेटपटूही आहेत. त्यांनी धर्मरावबाबांचा डमी म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला, अशी राजकीय गोटात चर्चा आहे.