शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
4
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
5
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
6
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
7
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
8
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
9
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
10
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
11
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
12
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
13
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
14
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
15
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
16
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
17
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
18
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
19
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
20
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनात 50 टक्क्यांहून अधिक रूग्णांचा मृत्यू उच्च रक्तदाबामुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 05:00 IST

काही रूग्ण अतिशय गंभीर स्थितीत भरती होत असल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू होत होता. २८ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील १०१ कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार मृत्यू पावलेल्यांपैकी ५० टक्केपेक्षा अधिक रूग्ण हायपरटेन्शनने ग्रस्त होते. सुरूवातीच्या कालावधीत कोरोनाची भयंकर भिती होती

ठळक मुद्देमधुमेहानेही अनेकांचा गेला जीव; वेळीच उपचाराकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाने ग्रस्त असलेल्या रूग्णांच्या एकूण मृत्यूपैकी ५० टक्क्याहून अधिक रूग्णांचा मृत्यू उच्चरक्तदाबाने झाला आहे.बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेह, रक्तदाब, हृदयरोगाचे प्रमाण वाढत चालले आहे. धडधाकट व्यक्ती कोरोनापासून सहज मुक्त होत होते. मात्र वयोवृध्द नागरिक तसेच मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग व इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या नागरिकांना मात्र कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर होत होती. तालुकास्तरावर असलेल्या बहुतांश रूग्णांना जिल्हास्थळी हलवावे लागत होते. काही रूग्ण अतिशय गंभीर स्थितीत भरती होत असल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू होत होता. २८ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील १०१ कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार मृत्यू पावलेल्यांपैकी ५० टक्केपेक्षा अधिक रूग्ण हायपरटेन्शनने ग्रस्त होते. सुरूवातीच्या कालावधीत कोरोनाची भयंकर भिती होती. त्यामुळे उच्च रक्तदाबग्रस्त रूग्णाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याचा रक्तदाब आणखी वाढत होता. तसेच मधुमेहग्रस्तही कोरोनाचे बळी पडले आहेत.कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वयाचे विश्लेषण केल्यास बहुतांश व्यक्ती ६० वर्षांच्या पुढील वयाचे असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, गडचिरोली जिल्ह्यात जे एकूण मृत्यू झाले, त्यामध्ये २० वर्षांपेक्षा कमी वयाच्या एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. सर्वाधिक कमी वयाचा रूग्ण २२ वर्षांचा असून तो देसाईगंज येथील आहे. वाढत्या वयाबरोबरच अनेक आजार वाढतात. तसेच वयोवृध्द नागरिकाची रोगप्रतिकारक क्षमता कमी होत असल्याने कोरोनापासून धोका होत होता. त्यामुळेच वयावृध्द नागरिकांनी गर्दीत जाऊ नये. तसेच अनावश्यक प्रवास करू नये, असा सल्ला आरोग्य विभागामार्फत दिला जात होता.मधुमेह आहे, काळजी घ्या !उच्च रक्तदाबाबरोबरच मधुमेह असलेल्या रूग्णांना कोरोनापासून धोका आहे. मधुमेहग्रस्त रूग्णाला कोरोनाची लागण झाल्यास त्याची प्रकृती गंभीर होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मधुमेहग्रस्त नागरिकांनी कोरोना होणार नाही,यासाठी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. तसेच ज्या रूग्णांना मधुमेह आहे अशांनी तत्काळ रूग्णालयात भरती होण्याची गरज आहे. मधुमेहग्रस्त रूग्णावर वेळीच उपचार झाल्यास कोरोनापासून मुक्ती मिळण्यास मदत होईल. याबाबत नागरिकांनी जागरूक राहून खबरदारी घेण्याची गरज आहे.रोग लपविल्याने अनेकांचा गेला जीवकोरोनाची लागण होऊनही काही रूग्ण खासगी रूग्णालयातच इतर उपचार करीत होते. प्रकृती गंभीर झाल्यानंतर जिल्हा रूग्णालयात ते भरती होत होते. त्यामुळे नागरिकांनी योग्य काळजी घेण्याची गरज आहे.

टॅग्स :Healthआरोग्य