शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

सदस्य गैरहजर; अविश्वास बारगळला

By admin | Updated: September 20, 2015 01:55 IST

येथील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व समाजकल्याण सभापतीवर काही सदस्यांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव शनिवारी बोलाविलेल्या विशेष सभेत ...

जि.प.तील राजकारण : अध्यक्ष, उपाध्यक्ष, समाज कल्याण सभापतींना जीवदानगडचिरोली : येथील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व समाजकल्याण सभापतीवर काही सदस्यांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव शनिवारी बोलाविलेल्या विशेष सभेत एकही सदस्य उपस्थित न राहिल्याने बारगळला. यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे, उपाध्यक्ष जीवन नाट व समाजकल्याण सभापती विश्वनाथ भोवते यांना जीवदान मिळाले.आॅगस्ट महिन्यात विरोधकांकडून सत्ताधारी पदाधिकाऱ्यांवर अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. परंतु त्यांचे मनसुबे हाणून पाडत जिल्हा परिषद अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे, उपाध्यक्ष जीवन नाट व समाजकल्याण सभापती विश्वनाथ भोवते यांनी अविश्वास प्रस्ताव नामंजूर करण्यासाठी लागणाऱ्या १८ सदस्यांची जुळवाजुळव करुन ५ सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावावर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप, शिवसेना व युवाशक्ती संघटनेच्या काही सदस्यांच्या सहया होत्या. हे सदस्य व आणखी काही सदस्य सहलीला रवाना झाले होते. या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्हा परिषद सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. उपविभागीय अधिकारी दुर्वेश सोनवणे हे पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या मदतीला नायब तहसीलदार एम.एम. शेंडे व उपमुख्य कार्यपालन अधिकारी विजय मुळीक हेही सभागृहात उपस्थित होते. दुपारी १ वाजता सभेची वेळ होती. परंतु ५० पैकी एकही सदस्य सभागृहात उपस्थित झाला नाही. अविश्वास प्रस्ताव पारित होण्यासाठी ३४ सदस्यांची, तर फेटाळून लावण्यासाठी १७ सदस्यांची गरज होती. परंतु एकही सदस्य उपस्थित न राहिल्याने अविश्वास प्रस्ताव बारगळल्याचे पीठासीन अधिकाऱ्यांनी जाहीर केले. अविश्वास बारगळल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध नेत्यांशी तसेच सदस्यांशी चर्चा केली. आगामी काळात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात सिंचन प्रश्नावर भर देऊन काम केले जाईल. या कामासाठी आपण जातीने लक्ष देणार असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. जिल्हा परिषद अध्यक्ष कुत्तरमारे यांनी जिल्हा परिषदेत अध्यक्ष पदाची धूरा स्वीकारल्यानंतर विविध आरोग्य केंद्र, पंचायत समिती यांना आकस्मिक भेटी देऊन अनेक कर्मचाऱ्यांवर कारवाई केली होती. आपल्या अध्यक्ष पदाच्या काळात सिंचन व्यवस्था बळकटीकरणासोबतच शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.