शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

पाणी पुरवठ्यासाठी सुधारित डीपीआर बनणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 6:00 AM

शहरातील नळ पाणी पुरवठा योजना ही ग्रामपंचायतीच्या काळातील फार जुनी योजना आहे. लगतच्या वैनगंगा नदीवर ही योजना कार्यान्वित करण्यात आली असून बोरमाळा घाटाच्या मार्गावर जलशुध्दीकरण केंद्र आहे. शहरात जवळपास सात पाणी टाक्या असून वॉर्डावॉर्डात नळ पाईपलाईन टाकण्यात आली आहे. मात्र जलकुंभांना बरीच वर्ष झाली असून पाईपलाईनही जुनी झाली आहे.

ठळक मुद्दे३२ कोटीतून अद्ययावतीकरण : जुन्या टाक्यांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे काम सोपविले पॉलिटेक्निककडे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली शहरातील नळ पाणी पुरवठ्याच्या सुविधेत सुधारणा करून पाणी टंचाईची समस्या मार्गी लावण्याच्या उद्देशाने स्थानिक नगर पालिका प्रशासनाच्या वतीने नव्याने ३३ कोटींच्या कामांचा सुधारित डीपीआर पुन्हा शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. जुन्या योजनेतील पाणी टाकींचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे काम नगर पालिका प्रशासनाने साकोलीच्या पॉलिटेक्निक कॉलेजकडे सोपविले आहे.शहरातील नळ पाणी पुरवठा योजना ही ग्रामपंचायतीच्या काळातील फार जुनी योजना आहे. लगतच्या वैनगंगा नदीवर ही योजना कार्यान्वित करण्यात आली असून बोरमाळा घाटाच्या मार्गावर जलशुध्दीकरण केंद्र आहे. शहरात जवळपास सात पाणी टाक्या असून वॉर्डावॉर्डात नळ पाईपलाईन टाकण्यात आली आहे. मात्र जलकुंभांना बरीच वर्ष झाली असून पाईपलाईनही जुनी झाली आहे. परिणामी शहरातील पाणी पुरवठ्याच्या सुविधेत दोष निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी पाईपलाईन लिकेज राहात आहे. जलकुंभाच्या सभोवती संरक्षण भिंती नाहीत. शिवाय फिल्टर यंत्र, पम्पिंग मशिनरी व बऱ्याच ठिकाणचे वॉल्व जुने झाले आहेत. त्यामुळे या सर्वांची कार्यक्षमताही कमी झाली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाच्या वतीने शहरातील पाणी पुरवठ्याची सुविधा अद्यावत करण्यासाठी ३३ कोटींच्या कामांचा डीपीआर तयार करण्यात आला आहे.विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत या संदर्भातील ठराव पारित करण्यात आला. त्यानंतर पाणी योजनेच्या कामांचा डीपीआर तयार करून तो महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मुख्य अभियंत्याकडे सादर करण्यात आला. तेथून हा प्रस्ताव मुंबईच्या मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यात आला. दरम्यान या प्रस्तावात काही त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे सदर प्रस्ताव न.प. कार्यालयाकडे परत पाठविण्यात आला.आता पालिकेच्या वतीने त्रुटींची पूर्तता करण्यात आल्या असून ग्रा.पं.च्या काळातील जुन्या पाणी टाक्या निर्लेखित करण्यासाठी स्ट्रक्चरल आॅडिट करणे आवश्यक आहे. त्याची जबाबदारी सुरूवातीला गडचिरोलीच्या पॉलिटेक्निक कॉलेजकडे सोपविण्यात आली होती. मात्र येथील तज्ज्ञ प्राध्यापक दीर्घ रजेवर असल्याने हा प्रस्ताव साकोलीच्या पॉलिटेक्निक कॉलेजकडे पाठविण्यात आला. तेथून आॅडीट अहवाल प्राप्त झाल्यावर पुन्हा सुधारीत डीपीआर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नागपूर व मुंबई कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे.अशी होणार कामेपाणी पुरवठा योजनेच्या नवीन सुधारीत डीपीआरमध्ये दोन पाण्याच्या टाक्या, शहरात नळ पाईपलाईन, पम्पिंग मशीनरी, फिल्टर यंत्र तसेच आवश्यक असलेले वॉल्व आदींची कामे करण्यात येणार असल्याचे न.प.च्या सुत्रांनी सांगितले.जलकुंभाची क्षमता वाढणारग्रामपंचायतीच्या काळातील जुन्या पाणी टाक्या त्यावेळच्या लोकसंख्येला अनुसरून छोट्या स्वरूपाच्या बांधण्यात आल्या. मात्र आता गडचिरोली शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. परिणामी नळ योजनेचे पाणी अपुरे पडत आहे. सध्या अस्तित्वात असलेली गांधी चौकातील पाणी टाकी चार लाख लिटर तर गोकुळनगरातील एक लाख लिटर क्षमतेची आहे. नवीन डीपीआरनुसार गोकुलनगर येथे सात लाख लिटर क्षमतेची तर इंदिरा गांधी चौकात १४ लाख लिटर क्षमतेची पाणी टाकी बांधण्यात येणार आहे.

टॅग्स :Waterपाणी