शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम भागात आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:01 IST

कोरची तालुक्यापासून ५३ किमी अंतरावर असलेल्या गोडरी या जंगलव्याप्त गावाला भेट दिली. या गावात ४० घरे असून गावाची लोकसंख्या १६३ एवढी आहे. दरवर्षी पावसाळ्यात या गावाचा तालुक्याशी संपर्क तुटते. डोंगरावर वसलेल्या या गावापर्यंत दुचाकी किंवा चारचाकी वाहन जात नाही. पायदळ डोंगर चढून गाव गाठावे लागते. या गावाला तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विनोद मडावी व त्यांच्या पथकाने भेट दिली.

ठळक मुद्देगोडरी व बोटेझरी गावांना भेट : जलजन्य, क्षयरोग, हिवतापाबाबत मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : आरोग्य विभागाने दुर्गम भागातील गावांना भेटी देऊन तेथील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यास सुरूवात केली आहे. कोरचीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विनोद मडावी यांच्या नेतृत्वातील पथकाने सोमवारी बोटेझरी व गोडरी गावातील सर्वच नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांच्या आरोग्याविषयक समस्या जाणून घेतल्या.
कोरची तालुक्यापासून ५३ किमी अंतरावर असलेल्या गोडरी या जंगलव्याप्त गावाला भेट दिली. या गावात ४० घरे असून गावाची लोकसंख्या १६३ एवढी आहे. दरवर्षी पावसाळ्यात या गावाचा तालुक्याशी संपर्क तुटते. डोंगरावर वसलेल्या या गावापर्यंत दुचाकी किंवा चारचाकी वाहन जात नाही. पायदळ डोंगर चढून गाव गाठावे लागते. या गावाला तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विनोद मडावी व त्यांच्या पथकाने भेट दिली. गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी केली. तसेच हिवताप, सिकलसेल, जलजन्य आजार, कोविड-१९, क्षयरोग आदींविषयी जनजागृती केली. आरोग्य तपासणीदरम्यान हिवतापाचे तीन रुग्ण निघाले. त्यांच्यावर औषधोपचार केले.
यावेळी कोटगूल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.हरीष टेकाम, आरोग्य सहायक अतुल बोदेले, अनिकेत भांडारकर, स्वप्नील गोमासे, आरोग्य सेवक देवारे, क्षयरोग पर्यवेक्षक प्रमोद सातपुते आदी उपस्थित होते.

टॅग्स :Healthआरोग्य