शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

मालदुगी येथे गोंडीधर्म संमेलन

By admin | Updated: March 2, 2016 01:57 IST

पहांदीपारी कुपारलिंगो गोंडीधर्म महासंघाच्या वतीने तालुक्यातील मालदुगी येथे दोन दिवसीय गोंडीधर्म संमेलनाचे आयोजन करण्यात आले.

मार्गदर्शन : वीर बाबुराव शेडमाके यांच्या पुतळ्याचे अनावरणकुरखेडा : पहांदीपारी कुपारलिंगो गोंडीधर्म महासंघाच्या वतीने तालुक्यातील मालदुगी येथे दोन दिवसीय गोंडीधर्म संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.संमेलनाचे उद्घाटन राजे वासुदेवशहा टेकाम यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी आनंद मडावी होते. ध्वजारोहण माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांनी केले. पुतळ्याचे अनावरण सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक निताराम कुमरे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून माजी आ. हरिराम वरखडे, श्यामकांत मडावी, प्रकाश सलामे, खुशाल सुरपाम, मारोती उईके, मणिरावण दुग्गा, रंजना उईके, अ‍ॅड. सुफरंजन उसेंडी, प्राचार्य डॉ. विजयकुमार खंडाते, प्रा. दौलत धुर्वे, रमेश कोरचा, प्रा. अर्चना खंडाते, गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा, अ‍ॅड. लालसू नरोटे, डॉ. पीतांबर कोडापे, सदानंद ताराम, संदीप वरखडे, यशोधरा नंदेश्वर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी म्हणाले की, गोंडी संस्कृती ही सगळ्या संस्कृतीची जणनी आहे. तिचे जतन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. गोंडीभाषा ही प्राचीन भाषा आहे. तिला जीवंत ठेवण्यासाठी प्रत्येकाने ही भाषा बोलली पाहिजे, शक्यतो याच भाषेतून व्यवहार केला पाहिजे, असे प्रतिपादन केले.संचालन गोंडीधर्म महासंघाचे सचिव गणेश हलामी, प्रास्ताविक नंदकिशोर नैताम तर आभार सी. आर. नैताम यांनी मानले. यशस्वीतेसाठी पितृशक्ती भिमाल दल, मातृशक्ती जंगोम दल व युवा सोडूम दल यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)