शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरीच्या पुलाला आबांचे नाव द्या!

By admin | Updated: December 29, 2016 01:46 IST

तेलगंणा-महाराष्ट्र राज्याला जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील पुलाच्या कामाला तत्कालीन पालकमंत्री आर.

सोशल मीडियावरूनही प्रचार : राष्ट्रवादीसह सिरोंचा तालुक्यातील जनतेची मागणी गडचिरोली : तेलगंणा-महाराष्ट्र राज्याला जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील पुलाच्या कामाला तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांच्या पाठपुराव्यामुळेच गती आली. तत्कालीन काँग्रेसप्रणीत केंद्र सरकारने या पुलाच्या कामासाठी ३५० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला. आता या पुलाचे लोकार्पण होत आहे. भाजपप्रणीत सरकारने या पुलाला महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसह सिरोंचा तालुक्यातील व गडचिरोलीतील नागरिकांनी व्यक्त केली आहे. सिरोंचा हा महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरचा तालुका आहे. या तालुक्याचा दैनंदिन व्यवहार तेलंगणा राज्यातील जिल्ह्यांमध्ये चालतो. या भागात १४ वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्गही मंजूर करण्यात आला. अनेक लोक गोदावरी नदीतून नावेने तत्कालीन आंध्रप्रदेश राज्यात जात होते. सिरोंचा तालुक्यासह अहेरी उपविभागाच्या विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने गोदावरी नदीवर पूल बांधल्या गेला पाहिजे, ही पालकमंत्री आर. आर. पाटील यांची भावना होती. गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व २०१० मध्ये स्वीकारल्यानंतर त्यांनी वेळोवेळी सिरोंचाला भेटी देऊन या पुलाच्या जागा प्रस्तावित करण्यापासून ते या कामाचे भूमिपूजन करून त्यासाठी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, केद्रीय गृहमंत्री चिदंबरम यांच्याकडे निधीसाठी पाठपुरावा केला. स्थानिक खासदार व आमदारांनाही या कामात सोबत घेतले व या पुलाच्या कामाला गती दिली. आज तेलंगणाची बससेवा थेट सिरोंचापर्यंत येऊ लागली आहे. आर. आर. पाटील यांनी केलेल्या या पाठपुराव्यामुळे हा पूल पूर्णत्वास आला. त्यामुळे विद्यमान केंद्र व राज्य सरकारने आर. आर. पाटील यांचे नाव या पुलाला देऊन आपले कर्तव्य पार पाडावे, अशी भावना गडचिरोली जिल्हावासीयांसह सिरोंचा तालुकावासीयांचीही आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आर. आर. पाटील यांच्या स्मारकासाठी निधीही मंजूर करून राजकारणातील एक मोठा निर्णय घेतला. त्याच धर्तीवर या पुलाला आर. आर. पाटील यांचे नाव देण्याचेही काम मार्गी लावावे, अशी मागणी करण्यात आली आहे. ३० डिसेंबर रोजी राज्यपाल डॉ. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत सिरोंचा येथे या पुलाचे लोकार्पण होऊ घातले आहे. त्या पार्श्वभूमिवर सोशल मीडियावरही आबांचे नाव देण्याबाबत प्रचार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. यासंदर्भात पत्रकार परिषदेत जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना विचारणा करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या निधीतून हा पूल झाला आहे. तेलंगणातूनही स्थानिक आमदारांचे नाव पुलाला द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. हा संपूर्णत: निर्णय केंद्र सरकारच्या अखत्यारित आहे. त्यामुळे आपल्याला काहीही सांगता येणार नाही, असे सांगून अप्रत्यक्षरित्या पुलाच्या नावाबाबतच्या प्रश्नाला बगल दिली. गोदावरील नदीच्या पुलाचे काम तत्कालीन गृहमंत्री व गडचिरोलीचे पालकमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुढाकाराने झाले. सरकारने या पुलाचे लोकार्पण करताना आर. आर. पाटील यांचे नाव या पुलाला दिले पाहिजे, यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मोठी प्रचार मोहीम हाती घेण्यात आली आहे. वॉट्सअ‍ॅप, फेसबुक याच्या माध्यमातूनही लोकांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचाव्यात हा यामागचा हेतू आहे. - श्रीनिवास गोडसेलवार, ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, गडचिरोली