शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

केवायसीच्या नावाखाली आर्थिक फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 05:00 IST

पेटीएम, फोन पे किंवा गुगल पे सारख्या अप्लीकेशनचा वापर करण्यासाठी आपल्या खात्याशी संलग्न करावे लागते. त्याकरिता एटीएम कार्डचा नंबर टाकून अकाऊंट उघडावे लागते, असे सांगितले जाते. अहेरी येथील इलेक्ट्रॉनिक्स व्यापारी श्रीनिवास गद्देवार यांना एक निनावी कॉल आला. आम्ही पेटीएम कस्टमरच्या सर्व्हीसमधून बोलत आहो, आपल्या मोबाईल नंबरवर येणारा ओटीपी नंबर आम्हाला सांगा, अशी बतावणी गद्देवार यांना करण्यात आली.

ठळक मुद्देसतर्कतेची गरज : पेटीएम, फोन पे, गुगल पे माध्यमातून प्रकार वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कनागेपल्ली : ऑनलाईन स्वरूपात होणाऱ्या आर्थिक व्यवहारात गती आली असून हे व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मात्र केवायसीच्या नावाखाली फोन पे, पेटीएम, गुगल पे धारकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचा प्रकार अहेरी शहरात उघडकीस आला आहे. परिणामी ऑनलाईन व्यवहार करताना नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.इंटरनेच्या युगात सर्व कामे सोपी झाली आहेत. माणूस एकमेकाच्या जवळ आला आहे. नातेवाईक, मित्र व इतरांना पैसे पाठविणे, ऑनलाईन खरेदी करणे, टीव्ही व मोबाईलचा रिचॉर्ज मारणे, एका खात्यातून दुसºया खात्यात पैसे वळते करणे असे अनेक आर्थिक व्यवहार घरबसल्या स्मार्ट फोनच्या माध्यमातून सहज होत आहेत. कोरोना संचारबंदीच्या काळात बँकेत तसेच एटीएमच्या ठिकाणी जाऊन गर्दी करण्यापेक्षा स्मार्ट फोनच्या माध्यमातून ऑनलाईन आर्थिक व्यवहार करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. असे असले तरी इंटरनेटच्या प्रसिद्ध असलेल्या अप्लेकेशन्स पेटीएम, गुगल पे व फोन पे धारकांना अकाऊंट केवायसी करायचे आहे, असे सांगून त्यांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. अशाच प्रकारच्या आर्थिक फसवणुकीचा प्रकार अहेरी शहरात एका व्यापाºयाच्या उघडकीस आला. मात्र त्याने प्रसंगावधान राखल्याने त्याची आर्थिक फसवणूक झाली नाही.पेटीएम, फोन पे किंवा गुगल पे सारख्या अप्लीकेशनचा वापर करण्यासाठी आपल्या खात्याशी संलग्न करावे लागते. त्याकरिता एटीएम कार्डचा नंबर टाकून अकाऊंट उघडावे लागते, असे सांगितले जाते. अहेरी येथील इलेक्ट्रॉनिक्स व्यापारी श्रीनिवास गद्देवार यांना एक निनावी कॉल आला. आम्ही पेटीएम कस्टमरच्या सर्व्हीसमधून बोलत आहो, आपल्या मोबाईल नंबरवर येणारा ओटीपी नंबर आम्हाला सांगा, अशी बतावणी गद्देवार यांना करण्यात आली. गद्देवार यांच्या मोबाईलवर एक ओटीपीसह १० हजार रुपये खात्यातून वजा झाले असल्याचा संदेश आला. मात्र गद्देवार यांना संशय आल्याने त्यांनी आलेला ओटीपी नंबर त्यात टाकला नाही. अन्यथा त्यांच्या खात्यातून रक्कम वजा झाली असती. गद्देवार यांनी आपल्या खात्याची चौकशी केली असता, त्यांच्या खात्याची चौैकशी केली असता, खात्यातून पैसे वजा झाले नव्हते, असे दिसले. वेळीच त्यांनी आपले पेटीएम अ‍ॅप ब्लॉक केले.पेटीएम, गुगल, फोन पे यासारख्या अप्लीकेशनचा वापर करण्यासाठी आपल्या खात्याशी संलग्न करावे लागते. त्यासाठी एटीएमकार्ड व मोबाईल नंबर टाकून अकाऊंट उघडावे लागते. त्यामुळे फसवणूक करणारे लोक मोबाईलवर संपर्क करून ओटीपी नंबरची मागणी करतात आणि खात्यातून पैसे वजा करण्याची कार्यवाही करतात. त्यामुळे आॅनलाईन व्यवहार करणाºया सदर अप्लीकेशनधारकांनी अशा प्रकारचे निनावी फोन आल्यास नागरिकांनी आपल्या बँक खात्याशी संबंधी कोणतीही माहिती सांगू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.खात्यातून रक्कम वजा होऊनही प्रक्रिया दाखवते फेलगडचिरोली जिल्ह्याच्या शहरी भागातील बरेच लोक, सुशिक्षित युवक आणि विशेष करून ऑनलाईन क्षेत्रात काम करणारे शासकीय, निमशासकीय कर्मचारी फोन पे, गुगल पे, पेटीएमद्वारे आर्थिक व्यवहार करीत असतात. मात्र सदर आर्थिक व्यवहार हे निसंकोचपणे व निर्दोष होत असल्याचे दिसून येत नाही. बरेच लोक वीज बिल, टीव्ही, मोबाईल रिचार्ज, फोन पेच्या माध्यमातून करीत असतात. ही सर्व प्रक्रिया सुरू असताना अचानक कव्हरेजची समस्या दाखवून प्रक्रिया फेल झाल्याचा संदेश मोबाईलवर येतो. लगेच खात्यातून पैसे वजा झाल्याचा मॅसेज येतो. त्यानंतर कही वेळानंतर आपल्या खात्यातून कपात झालेले पैसे पुन्हा सात ते नऊ दिवसांत जमा होणार असल्याचा संदेश येतो. मात्र नऊ दिवस उलटूनही खात्यात पैसे पूर्ववत जमा होत नाही. हा अनुभव गडचिरोली शहरातील अनेक युवकांना व फोन पेधारकांना आल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :onlineऑनलाइनfraudधोकेबाजी