संमती 12 हजार पालकांची विद्यार्थी हजर 10 हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 05:00 AM2020-11-27T05:00:00+5:302020-11-27T05:00:21+5:30

काेराेनाचा संसर्ग कायम असतानाही शासनाने शाळा सुरू केल्या आहेत. याला काही पालकांचा विराेध आहे. शाळेत आल्यामुळे काेराेनाची लागण विद्यार्थ्यांना झाल्यास पालकांच्या राेषाचा सामना शाळा, शिक्षक व प्रशासनाला करावा लागू नये, यासाठी शाळेत येण्यापूर्वी संबंधित विद्यार्थ्याला त्याच्या पाल्याचे संमतीपत्र आवश्यक करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी २३ नाेव्हेंबर राेजी जवळपास दाेन ते तीन टक्के पालकांनीच संमतीपत्र भरून दिले हाेते. त्यानंतर मात्र संमतीपत्र भरून देणाऱ्या पालकांची संख्या वाढत आहे.

Consent 12 thousand parents student attendance 10 thousand | संमती 12 हजार पालकांची विद्यार्थी हजर 10 हजार

संमती 12 हजार पालकांची विद्यार्थी हजर 10 हजार

googlenewsNext
ठळक मुद्देदरदिवशी वाढताहे पटसंख्या, सकारात्मक भूमिका

  लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : २३ नाेव्हेंबपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. शाळेत येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पालकांचे संमतीपत्र आवश्यक करण्यात आले आहे. गुरूवारपर्यंत ११ हजार ५४५ पालकांनी संमतीपत्र भरून दिले आहेत. त्यापैकी जवळपास ९ हजार विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत येत आहेत. पहिल्या दिवशीच्या तुलनेत दरदिवशी वर्गातील पटसंख्या वाढत चालली आहे.
काेराेनाचा संसर्ग कायम असतानाही शासनाने शाळा सुरू केल्या आहेत. याला काही पालकांचा विराेध आहे. शाळेत आल्यामुळे काेराेनाची लागण विद्यार्थ्यांना झाल्यास पालकांच्या राेषाचा सामना शाळा, शिक्षक व प्रशासनाला करावा लागू नये, यासाठी शाळेत येण्यापूर्वी संबंधित विद्यार्थ्याला त्याच्या पाल्याचे संमतीपत्र आवश्यक करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी २३ नाेव्हेंबर राेजी जवळपास दाेन ते तीन टक्के पालकांनीच संमतीपत्र भरून दिले हाेते. त्यानंतर मात्र संमतीपत्र भरून देणाऱ्या पालकांची संख्या वाढत आहे. तसेच शाळेतील उपस्थिती सुध्दा वाढत चालली आहे. शिक्षण विभागामार्फत शाळांच्या सभा घेऊन त्यांना मार्गदर्शन करीत आहेत. काेराेनाची साथ पसरू नये, यासाठी शाळेत काेणत्या उपाययाेजना केल्या जाव्यात याबाबत शिक्षक, मुख्याध्यापक यांना मार्गदर्शन केले जात आहे. शिक्षकही पालकांच्या घरी जाऊन शाळेत काेणत्या सुविधा आहेत, हे सांगून पालकांचे मन वळवित आहेत. 

ग्रामीण भागातील शाळांना चांगला प्रतिसाद
शहर व तालुकास्तरावरील शाळांच्या तुलनेत ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती बऱ्यापैकी असल्याचे दिसून येत आहे. काही शाळांमध्ये तर जवळपास ५० टक्के विद्यार्थी उपस्थित आहेत. दरदिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत चालली आहे.  अध्यापनाचे कामही सुरू झाले आहे.

शासनाच्या निर्देशानुसार शाळांनी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत की नाही. तसेच नियमांचे पालन केले जात आहे की नाही, याची पाहणी शिक्षण विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष शाळांना भेट देऊन करीत आहेत. ग्रामीण भागात चांगली उपस्थिती दिसून येत आहे. पालक सुध्दा  विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याविषयी सकारात्मक असल्याचे दिसत आहे. 
- राजकुमार निकम, 
शिक्षणाधिकारी माध्यमिक

शहरात व तालुक्यात काेराेना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शाळेत पाठविणे धाेकादायक वाटत असले तरी शैक्षणिक नुकसान हाेऊ नये, यासाठी पाल्याला शाळेत पाठविले जात आहे. काेराेनाचा संसर्ग हाेणार नाही, यासाठी शाळेने सुध्दा याेग्य ती खबरदारी घेण्याची गरज  निर्माण झाली आहे.
- दिनेश भांडेकर, पालक

Web Title: Consent 12 thousand parents student attendance 10 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.