शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

काळी पिवळी टॅक्सी उलटली

By admin | Updated: April 10, 2017 00:57 IST

गडचिरोली नगर परिषदेतील नऊ कामगार पर्यटनासाठी भामरागड तालुक्यातील बिनागुंडा येथे गेले होते.

१२ जण जखमी : लाहेरी गावानजीकची घटनालाहेरी : गडचिरोली नगर परिषदेतील नऊ कामगार पर्यटनासाठी भामरागड तालुक्यातील बिनागुंडा येथे गेले होते. तेथून भामरागडकडे परत येत असताना काळी-पिवळी टॅक्सी उलटल्याने चालकासह टॅक्सीतील १२ जण जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास लाहेरी गावापूर्वी दोन किमी अंतरावर घडली. या अपघातात राजेश मधुमटके यांचे आठ सहकारी तसेच टॅक्सी चालक व त्याचे दोन सहकारी असे १२ जण जखमी झाले. लाहेरी पोलिसांनी त्यांना प्राथमिक उपचारासाठी लाहेरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अहेरीच्या उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. या घटनेची नोंद लाहेरी उपपोलीस ठाण्यात करण्यात आली असून काळी-पिवळी टॅक्सीचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक रवींद्र गवारी करीत आहेत. दुसऱ्या शनिवारला ८ एप्रिल रोजी शासकीय सुटी असल्याने गडचिरोली नगर परिषदेतील कामगार राजेश मधुमटके यांच्यासह त्यांचे नऊ सहकारी भामरागड तालुक्यातील लाहेरी नजीकच्या बिनागुंडा येथील निसर्गरम्य धबधबा पाहण्यासाठी एका खासगी वाहनाने भामरागडला आले. मात्र भामरागड-बिनागुंडा हा कच्चा रस्ता असल्याने झायलो गाडीच्या चालकाने बिनागुंडाला येण्यास नकार दिला. त्यामुळे या सर्व लोकांनी भामरागड येथून एमएच ३३ एम ५०९८ क्रमांकाची खासगी काळी-पिवळी टॅक्सी भाडेतत्वावर घेतली. १२ जण या वाहनाने बिनागुंडा येथे गेले. तेथील निसर्गरम्य धबधबा पाहून झाल्यावर ते भामरागडकडे परत येत होते. दरम्यान लाहेरी गावापूर्वी सुमारे दोन किमी अंतरावर टॅक्सी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने या वाहनाला अपघात घडला व वाहन उलटले. यात टॅक्सीतील बाराही जण जखमी झाले. या जखमींवर उपचार सुरू आहेत. (वार्ताहर)