शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
3
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
4
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
5
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
6
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
7
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
8
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
9
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
11
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
12
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
13
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
14
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
16
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
17
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
18
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
19
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
20
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

२३ गावे विजेने प्रकाशली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2017 01:26 IST

धानोरा व एटापल्ली तालुक्यातील २३ गावांमध्ये वीज पोहोचविण्याचे काम महावितरणच्या मार्फत करण्यात आले आहे.

धुसागुडात पोहोचली वीज : एटापल्ली व धानोरातील गावांचा समावेश गडचिरोली : धानोरा व एटापल्ली तालुक्यातील २३ गावांमध्ये वीज पोहोचविण्याचे काम महावितरणच्या मार्फत करण्यात आले आहे. गावात पहिल्यांदाच वीज पोहोचल्याने या गावातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकू लागला आहे. ज्या गावांपर्यंत वीज पोहोचली नाही, अशा गावांना प्राधान्य देत त्या गावामध्ये वीज पोहोचविण्याचे काम महावितरणने सुरू केले आहे. २० डिसेंबर २०१६ पासून वीज जोडणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मागील तीन महिन्यात धानोरा तालुक्यातील मरकेगाव, पुत्तरगोंडी, मागदंडटोला, रेजूटोला, किसनेली, मोठाझेलिया, लहान वडगाव, सालईटोला, मारगीनटोला, हुर्राटोला, केहकावाही, धुरमुडाटोला, येरंडीटोला, भुसूनकुडो, दंबा, राणवाही, शिवगोटा ही १७ गावे व एटापल्ली तालुक्यातील एकराटोला, कुद्री, कामके, रोपी, पैदी, झुप्पी, धुसागुडा ही सहा गावे अशी एकूण २३ गावे जोडण्यात आली आहेत. महावितरणचे आलापल्ली विभागाचे कार्यकारी अभियंता अमित परांजपे यांनी चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल व गडचिरोली मंडळाचे अधीक्षक अभियंता अशोक मस्के व तत्कालीन प्रभारी अधीक्षक अभियंता व सध्या ब्रह्मपुरी विभागाचे कार्यकर्ता अभियंता असलेले युवराज मेश्राम यांच्या मार्गदर्शनात विद्युतीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. ते पूर्ण करण्यात आल्याचे महावितरणने म्हटले आहे. (प्रतिनिधी)