शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यासोबतच वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो गूळ; असा करा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 12:36 IST

जेवल्यानंतर अनेकांना काही 'कुछ मीठा हो जाये म्हणत' काहीना काही गोड पदार्थ खाण्याची सवय असते. तुम्हीही त्यांच्यापैकीच एक असाल तर जेवण झाल्यानंतर साखर किंवा मिठाई खाण्याऐवजी गूळ खा.

जेवल्यानंतर अनेकांना काही 'कुछ मीठा हो जाये म्हणत' काहीना काही गोड पदार्थ खाण्याची सवय असते. तुम्हीही त्यांच्यापैकीच एक असाल तर जेवण झाल्यानंतर साखर किंवा मिठाई खाण्याऐवजी गूळ खा. काहीतरीच नाही, खरं सांगतोय... गूळ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. अ‍ॅन्टीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असणारा गूळ अनेक समस्यांवर गुणकारी ठरतो. ज्यामध्ये आयर्न, पोटॅशिअम, गंधक, फॉस्फरस, कॅल्शिअम, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ही मुबलक प्रमाणात आढळून येतं. गुळ खाल्याने फक्त आपलं रक्त स्वच्छ होत नाहीतर शरीरातील मेटाबॉलिज्मची पातळीही नियंत्रणात राहते. त्यामुळे गूळ वजन कमी करण्यासाठी मदत करतो. कसं ते जाणून घेऊया... 

गूळ कमी करतो कॅलरी 

जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर डाएटमध्ये साखरऐवजी गुळाचा वापर करा. कारण साखरेच्या तुलनेत गुळामध्ये कॅळरीचे प्रमाण फार कमी असतं. त्यामुळे तुम्ही याचा वापर नॅचरल स्वीटनर म्हणूनही करू शकता. 

पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी 

आयुर्वेदातही गुळाचे अनेक फायदे सांगितले आहेत. गूळ रक्त स्वच्छ करून रक्त वाढवतो. तसेच गूळ खाल्याने भूकही लागते. तसेच गॅस, अपचन किंवा अ‍ॅसिडीटीसारख्या समस्यांनी त्रस्त असाल तर यावर उपाय म्हणून गळू खाऊ शकता. गूळ सैंधव मीठ, काळं मीठ एकत्र करून खाल्याने आंबट ढेकर येणं बंद होतं. 

शरीर करा डिटॉक्स 

गूळ, रक्त स्वच्छ करून शरीरातील हानिकारक टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी मदत करतो. ज्यामुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत होते. जसं ग्रीन टी शरीर डिटॉक्स करून वजन कमी करते तसचं गूळ शरीर डिटॉक्स करून वजन कमी करण्याचं काम करतो. 

मेटाबॉलिज्मचा रेट वाढवतो गूळ 

गुळामध्ये पोटॅशिअमचे प्रमाण अधिक असतं. ज्यामुळे शरीरातील मेटाबॉलिज्मचा रेट वेगाने वाढतो आणि जेव्हा शरीराचा मेटाबॉलिक रेट जास्त असतो. तेव्हा कॅलरी बर्न करून वेगाने वजन कमी करण्यासाठी मदत मिळते. 

मर्यादेत करा सेवन 

तसं पाहायला गेलं तर गूळ आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो आणि अनेक आजार दूर करण्यासाठीही मदत करतो. पण तरिसुद्धा कोणताही पदार्थ प्रमाणापेक्षा जास्त खाल्याने शरीराला काही समस्या होऊ शकतात. त्यामुळे गूळाचं सेवनही प्रमाणात करणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. 

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सHealthy Diet Planपौष्टिक आहारHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स