शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय पुरुषांचा लैंगिक हिंसाचार वाढतोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 01:41 IST

संपूर्ण जगभरातून भारतातील महिला सुरेक्षेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. 

देशाची राजधानी असूनही दिल्लीमध्ये महिला सुरक्षित नाही तर देशातील इतर भागाची स्थिती काय असेल, असा प्रश्न म्हणूनच सातत्याने उपस्थित व्हायला लागला आहे. त्यातच आता एका सर्वेक्षणातून कडवट सत्य बाहेर आले आहे. 'इंटरनॅशनल सेंटर फॉर वुमेन'तर्फे करण्यात आलेल्या एका सर्व्हेनुसार भारतातील २५ टक्के पुरुषांनी महिलांवर कोणत्या ना कोणत्या प्रकारे लैंगिक हिंसाचार केला आहे. हे प्रमाण रवांडा, मेक्सिको, क्रोशिया आणि चिलीसारख्या देशांपेक्षा खूप जास्त आहे.
भारतामध्ये दररोज ९0 महिलांवर बलात्कार होतो. बलात्कारांची ही वाढती संख्या लक्षात घेता वेळीच यावर उपाय करण्याची गरज निर्माण झालेली आहे.
भारतीय तरुणांमध्ये लैंगिक हिंसाचार वाढण्यास - घरामध्ये वडिलांना आईला बेदम मारहाण करताना पाहणे, रोडरोमिओंना वेळीच वेसण न घालणे, व्यसनाधिनता - अशी विविध कारणे या सर्व्हेतून पुढे आली आहेत.
भारतीय पुरुषांची मानसिकता समजून घेण्यासाठी दिल्ली आणि विजयवाडा येथील १८ ते ५९ वयोगटातील दोन हजार पुरुषांना बलात्कार, बालपणातील अत्याचार, लैंगिक समानता, नातेसंबंधी प्रश्न विचारण्यात आले. यातून असे दिसून आले, की लहानपणी दुर्लक्षित किंवा अत्याचार झालल्या पुरुषांमध्ये लैंगिक हिंसाचार बळावतो. चाईल्ड लाईन फाऊंडेशनच्या अनुराधा विद्याशंकर म्हणतात, लहान वयात मुलांना प्रेम, माया, जिव्हाळ्याची गरज असते. खडतर बालपणाचा व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर फार विपरित परिणाम होतो आणि मग त्याच्या हातूनही असेच दृष्कृत्य घडत असते.