शहरं
Join us  
Trending Stories
1
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
2
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
3
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
4
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
5
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
6
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
7
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
8
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
9
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
10
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
11
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
12
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
13
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
14
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
15
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
16
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
17
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
18
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
19
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
20
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

पालकांनो! मुलांना बोटावर मोजायला शिकवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2016 11:21 IST

संशोधकांनी निष्कर्ष काढला की, ज्या मुलांचे ‘फिंगर पर्सेप्शन’ जास्त चांगले असते त्यांची गणितात चांगली प्रगती होते.

आपल्यापैकी बरेच जण लहानपणी बोटावर मोजूनच गणित शिकले असतील. सुरूवातील बेरीज-वजाबाकी बोटांवरच केली जाते. पण आपण जसे जसे मोठे होते तशी ही सवय कमी होते आणि आपण जास्तीत जास्त कॅलक्युलेशन्स डोक्यातच करतो. परंतु मनातल्या मनात झटपट व अचूक मोजणी करण्यासाठी या बोटांवर मोजण्याच्या सवयीचा खूप फायदा होतो.एका संशोधनानुसार ज्या लहान मुलांना आपल्या हातांची चांगली समज असते, ती मुलं गणितात अधिक हुशार असतात. त्यामुळे पालकांनी आवर्जून आपल्या मुलांना बोटांवर मोजणी करण्याची सवय लावलेली बरी.इंग्रजीमध्ये याला ‘फिंगर पर्सेप्शन’ असे म्हणतात. म्हणजे बोटांची ओळख, दोन बोटांतील फरक कळणे. याचा संबंध थेट आपल्या गणितीय कौशल्याशी असतो. एवढेच नाही तर ही सवय असणाऱ्या लोक जेव्हा मनातल्या मनात कॅलक्युलेशन्स करतात तेव्हा त्यांच्या बोटांशी संबंधीत मेंदूचा भाग सक्रीय असतो, असे संशोधनात दिसून आले.अमेरिकेतील गॅलौडेट विद्यापीठातील इलरिया बर्टेलेटी यांनी हे अध्ययन केले आहे. लहान मुलांचा मेंदू कसा काम करतो हे समजून घेण्यासाठी त्यांनी आठ ते तेरा वयोगटातील ३९ विद्यार्थ्यी मनातल्या मनात एक अंकी वजाबाकी व गुणाकार करत असताना त्यांच्या मेंदूचे स्कॅनिंग केले. तेव्हा असे दिसून आले की, वजाबाकीसाठी मुले बोटांचा वापर करत नसतानांही बोटांशी निगडित असलेले मेंदूचे दोन्ही ‘सोमॅटोसेन्सरी’ भाग सक्रीय होते. परंतु गुणाकार करताना अशी सक्रीयता आढळली नाही. मुले वजाबाकी व गुणाकार कशा प्रकारे शिकतात, त्या पद्धतील फरकामुळे, असे होत असावे असा संशोधकांचा अंदाज आहे.अध्ययनाअंती संशोधकांनी निष्कर्ष काढला की, ज्या मुलांचे ‘फिंगर पर्सेप्शन’ जास्त चांगले असते त्यांची गणितात चांगली  प्रगती होते.