शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बावड्यातील राजाराम बंधारा ग्रुपच्यावतीने बंधाऱ्याची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 16:27 IST

नेहमी सामाजिक कार्यात कायमच अग्रेसर असणाऱ्या कसबा बावडा येथील राजाराम बंधारा ग्रुपच्या वतीने आज पुन्हा एकदा पंचगंगा नदीमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. नदीतील घटस्थापनेचे निर्माल्य दूर करण्यात आले.

ठळक मुद्देबावड्यातील राजाराम बंधारा ग्रुपच्यावतीने बंधाऱ्याची स्वच्छता नदीतील घटस्थापनेचे निर्माल्य केले दूर

कसबा बावडा : नेहमी सामाजिक कार्यात कायमच अग्रेसर असणाऱ्या कसबा बावडा येथील राजाराम बंधारा ग्रुपच्या वतीने आज पुन्हा एकदा पंचगंगा नदीमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. नदीतील घटस्थापनेचे निर्माल्य दूर करण्यात आले.नुकताच दसरा सण होऊन गेला. अनेकांना वारंवार सांगूनही काहींनी घटस्थापनेचे निर्माल्य, मुर्त्या नदीमध्ये विसर्जित केल्या होत्या. त्यामुळे राजाराम बंधारा येथे नदीचे पाणी भरपूर प्रमाणात प्रदूषण झाले होते. यावर्षी ग्रुपच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले होते की घटस्थापनेचे घट हे नदीच्या पाण्यात न टाकता एका बाजूला ठेवावे.

या आवाहनालाही भरपूर नागरिकांनी प्रतिसाद दिला. तरी पण काही नागरिकांनी न ऐकता नदीमध्ये कचरा केलाच. त्यामुळे पाण्याला प्रचंड प्रमाणात दुर्गंधी व वास येत होता. हा सर्व कचरा ग्रुपच्या वतीने बाहेर काढण्यात आला व नदी स्वच्छ केली.या स्वच्छता मोहिमेमध्ये कविराज राजदीप, हनुमंत सूर्यवंशी, संजय चौगुले ,शिवाजी ठाणेकर, जितू केंबळे, धीरज मोरे, विलास तराळ, सूर्यकांत सुतार, संतोष गायकवाड, दीपक बेडेकर, अस्मिता म्हाकवे, ओमकार म्हाकवे, संग्राम जाधव, रावसाहेब शिंदे, देसाई तसेच राजाराम बंधारा चे इतरही सभासद उपस्थित होते. या अभियानात महानगरपालिकेचे कर्मचाऱ्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. 

टॅग्स :environmentपर्यावरणNavratriनवरात्रीDamधरणkolhapurकोल्हापूर