शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

शाळेची फी भरु न शकल्यानं आत्महत्येचा प्रयत्न करणारी विद्यार्थिनी १० च्या परीक्षेत पहिली!; शिक्षण मंत्री म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 19:46 IST

आर्थिक चणचणीमुळे शिक्षण घेता येत नसल्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या इयत्ता १० वीच्या विद्यार्थिनीनं बोर्डाच्या पुरवणी परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावला ...

आर्थिक चणचणीमुळे शिक्षण घेता येत नसल्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या इयत्ता १० वीच्या विद्यार्थिनीनं बोर्डाच्या पुरवणी परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावला आहे. शाळेची फी भरू न शकल्यानं शाळेच्या व्यवस्थापनानं हॉल तिकीट देण्यास विद्यार्थिनीला नकार दिला होता. कर्नाटकच्या तुमकुरू जिल्ह्यातील कोराटागेरे शहरातील १६ वर्षीय ग्रीष्मा नायक हिच्यासोबत ही घटना घडली होती. ग्रीष्मा हिनं हॉल तिकीट न मिळाल्यानं आत्महत्येचा विचार केला होता. पण या घटनेवर मात करुन ग्रीष्मा नायक हिनं इयत्ता १० वीच्या पुरवणी परीक्षेत टॉप केलं आहे. 

ग्रीष्मा नायक शेतकरी कुटुंबातील मुलगी असून तिला आता चांगल्या महाविद्यालयात विज्ञान शाखेत (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी) प्रवेश घ्यायचा आहे. इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार ग्रीष्मानं यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच बोर्डाची तयारी सुरू केली होती. "कोरोना संकटामुळे शाळेची फी भरणं शक्य नव्हतं. त्यामुळे शाळेनं वर्गात बसवण्यास नकार दिला. पण माझी मोठी बहिण कार्थाना हिनं मुख्य विषयांचा अभ्यास करण्यासाठी मला खूप मदत केली. परीक्षेच्या तीन महिन्यांआधीपासूनच भाषेच्या अभ्यासाला सुरुवात केली होती. पण फी न भरल्यामुळे शाळेकडून आपलं नाव रजिस्टर न केल्याचं लक्षात आल्यानंतर मी खूप खचले होते", असं ग्रीष्मानं सांगितलं. 

डॉक्टर होण्याचं ग्रीष्माचं स्वप्नग्रीष्माचं डॉक्टर होण्याचं स्वप्न ती नक्की पूर्ण करेल अशी खात्री तिच्या आई-वडिलांना आहे. ग्रीष्मा इयत्ता ९ वीपर्यंत दक्षिण कन्नड जिल्ह्यातील अल्वा येथील इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये शिक्षण घेत होती. शाळेची फी न भरल्यामुळे तिला शाळेत येण्यास बंदी घालण्यात आली होती. इतकंच नव्हे, तर दहावीच्या परीक्षेसाठी तिच्या नावाची देखील शाळेनं नोंदणी केली नाही. शाळेनं तिला हॉल तिकीट देण्यास नकार दिला होता. 

शिक्षण मंत्र्यांनी दखल घेतल्यानंतर मिळाली परीक्षेला परवानगीग्रीष्माच्या आई-वडिलांनी शाळेविरोधात थेट पब्लिक इंस्ट्रक्शन विभागातील उप-संचालकांकडे धाव घेतली. त्यानंतर हे प्रकरण थेट तत्कालीन प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंत्री एस सुरेश कुमार यांच्यापर्यंत पोहोचलं. राज्यभरातून अनेक ठिकाणी अशा घटना समोर आल्यानंतर शाळेची फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना हॉल तिकीट नाकारण्याच्या घटना होणार नाहीत याची काळजी शाळेनं घेण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले. इतकंच नव्हे, तर मंत्री सुरेश कुमार यांनी थेट ग्रीष्माची राहत्या घरी भेट घेऊन तिला पुरवणी परीक्षेला बसण्याची संधी देण्याचं आश्वासन दिलं होतं. 

ग्रीष्मानं मिळालेल्या संधीचं सोनं करत परीक्षेत अव्वल क्रमांक प्राप्त केला. याची माहिती एस कुमार यांना मिळताच ग्रीष्मा आता इतर विद्यार्थ्यांसाठी आदर्श बनली आहे, असं वक्तव्य केलं आहे. 

टॅग्स :ssc examदहावीKarnatakकर्नाटक