शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठांत 'सामंतशाही', मूल्यांकनावर परिणाम होण्याची भीती : आशिष शेलार

By जयदीप दाभोळकर | Updated: January 17, 2021 14:42 IST

ठाकरे सरकार आल्यापासून विद्यापीठांच्या स्वायत्तेवर घाला, शेलार यांचा आरोप

ठळक मुद्देठाकरे सरकार आल्यापासून विद्यापीठांच्या स्वायत्तेवर घाला, शेलार यांचा आरोपविद्यार्थी हिताच्या आड येणाऱ्या निर्णयांना विरोधच, शेलार यांचा इशारा

"राज्यात ठाकरे सरकार आल्यापासून विद्यापीठांच्या स्वायत्तेवर घाला घालण्यात येत असून उच्च शिक्षण मंत्र्यांकडून विद्यापीठात 'सामंतशाही' सुरु आहे. नॅक मूल्यांकन होणार असतानाच सरकारने मनमानी पद्धतीने कुलसचिवांची नियुक्ती केल्याने त्याचा विद्यापीठाच्या मूल्यांकनावर परिणाम हाईल की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. इथेही सरकारचा अहंकारच दिसून येत आहे," अशा शब्दांत भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी सरकारच्या कारभार टीका केली.मुंबई विद्यापीठाची नॅक मूल्यांकनांची तयारी सुरु असतानाच राज्य शासनाने ८ जानेवारी रोजी अचानक मुंबई विद्यापीठामध्ये नवीन कुलसचिवांची  परस्पर नियुक्ती केली.  विद्यापीठ कायद्याप्रमाणे कुलगुरुंनी प्रभारी कुलसचिव नेमला असतानाही व कोणतीही अनागोंदी नसतानाही राज्य सरकारने विद्यापीठात पुन्हा हस्तक्षेप सुरू केला. कुलगुरुंनी १४ जानेवारी रोजी राज्य सरकारला पत्र लिहून नॅक मूल्यांकन असल्याने आता कुलसचिव बदलल्यास त्याचा मूल्यांकनावर परिणाम होईल हे सांगितल्यावरदेखील सरकारने विद्यापीठावर मनमानी करून कुलसचिव थोपला. या बदलाचा नॅक मानांकनावर परिणाम झाल्यास राज्य सरकार जबाबदार राहील. विद्यापीठांचे सरकारी महामंडळ करण्याच्या दिशेने वाटचाल चालली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सरकारी हस्तक्षेप नको असेच म्हटलं असल्याचं शेलार म्हणाले. 

सरकारकडून मनमानी कारभार

"अहंकारी ठाकरे सरकारने मनमानी सुरुच ठेवली आहे. हा विद्यापीठांच्या स्वायत्तेवर घाला आहे," असा गंभीर आरोप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. राज्यात ठाकरे सरकार आल्यापासून विद्यापीठांची स्वायत्ता अशीच धोक्यात आली आहे. उच्च. शिक्षण मंत्री यांनी पदभार घेताच विद्यापीठांकडे आर्थिक हिशेब मागितले होते. त्याला विरोध होताच सारवासारव करण्यात आली. त्यानंतर  युजीसी, विद्यापीठ, कुलपती, कुलगुरू, सीनेट यांना डावलून सरकारने अंतिम वर्षे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय  परस्पर घेतला होता. त्याला ही विरोध झाला व न्यायालयाने, युजीसीने फटकारल्यानंतर परीक्षा घ्याव्या लागल्या होत्या. ठाकरे सरकारचा हा कारभार विद्यापीठांचा शैक्षणिक दर्जा, स्वायत्ता याला इजा करणारे आहे. आता  आपल्या मर्जीतील कुलसचिवांच्या नियुक्त्या करुन विद्यापीठांवर सरकारने ताबा मिळवला आहे. विद्यार्थी हिताच्या आड येणाऱ्या या निर्णयाला आम्ही याला विरोध करतो. आम्ही संघर्ष करु," असा इशाराही शेलार यांनी दिला आहे.

टॅग्स :universityविद्यापीठEducationशिक्षणAshish Shelarआशीष शेलारUday Samantउदय सामंतBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्र