शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
2
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
3
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
4
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
5
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
6
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
7
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
8
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
9
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
10
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
11
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
12
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
13
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
14
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
15
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
16
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
17
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
19
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
20
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस असल्याची बतावणी, मांडळ शिवारात वृध्दाला गंडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 21:37 IST

१ लाख ४३ हजार रुपये किंमतीचा ऐवज घेऊन पोबारा

धुळे : पोलिसांचे ओळखपत्र दाखवत दोघांनी एका वृध्दाला गंडा घालत त्याच्याकडील दागिने आणि घड्याळ असा १ लाख ४३ हजार रुपये किंमतीचा ऐवज घेऊन पोबारा केल्याची घटना शिरपुरातील मांडळ शिवारात रविवारी दुपारी घडली. याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात सायंकाळी ४ वाजता दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला.शिरपूर शहरातील मांडळ शिवारात असलेल्या हॉटेल साहेबा समोरुन दिलीप भभुतराव भैरव (५९, रा. महालक्ष्मी कॉलनी, शिरपूर) हे वृध्द पायी जात होते. रविवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास त्यावेळेस रस्त्यावर कोणीही नव्हते. ही संधी साधून दोन जण एका दुचाकीने या वृध्दाजवळ आले. आम्ही पोलीस आहोत अशी बतावणी करुन पोलीस उपनिरीक्षकांचे ओळखपत्र त्या वृध्दाला दाखविले. त्यानंतर सुरक्षितता म्हणून तुमच्याकडील दागिने आणि जी काही मौल्यवान वस्तू असेल ती आमच्याकडे द्या अशी बतावणी केली. पोलीस असल्याने त्या वृध्दाने त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत सोन्याचे दागिने आणि घड्याळ असा एकूण १ लाख ४३ हजार रुपये किंमतीचा ऐवज सुपूर्द केला. ऐवज मिळताच क्षणार्धात दोघा भामट्यांनी पळ काढला. बराचवेळ होऊनही ते दोघे परत आले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दिलीप भैरव यांनी शिरपूर शहर पोलीस ठाणे गाठले आणि फिर्याद दाखल केली. त्यानुसार, दोघा विरुध्द भादंवि कलम ४२०, १७०, १७१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल यू. जी. पाटील घटनेचा तपास करीत आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे