शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यातील निर्यातदारांना उत्कृष्ट संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:39 IST

धुळे : जागतिकीकरणामुळे सर्व जग एक बाजारपेठ झाले आहे. शासनाचे विविध विभाग आणि निर्यातदारांच्या सहकार्याने धुळे जिल्हा निर्यातीत ...

धुळे : जागतिकीकरणामुळे सर्व जग एक बाजारपेठ झाले आहे. शासनाचे विविध विभाग आणि निर्यातदारांच्या सहकार्याने धुळे जिल्हा निर्यातीत चांगली कामगिरी करू शकतो. त्यांनी ही संधी साधत जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना द्यावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आज सकाळी केंद्र सरकारचा वाणिज्य विभाग, राज्य शासनाचा उद्योग विभाग, विदेश व्यापार महानिदेशालय, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि जिल्ह्यातील निर्यातदार व औद्योगिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक्स्पोर्ट कॉन्क्लेव्ह’चे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी शर्मा यांच्या हस्ते झाले.

यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उपेंद्र सांगळे, उपसंचालक अमोल इंगळे, सहाय्यक आयुक्त के. डी. भामरे, निर्यात सल्लागार दिनेश देवरे, अग्रणी बँकेचे महाव्यवस्थापक मनोजकुमार दास, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चौधरी, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक गोपाल सक्सेना, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एमआयडीसी अवधान शाखेचे व्यवस्थापक जोशी, विदेश व्यापार महानिदेशालय, मुंबईचे एफटीडीओ संजय धुपेस्कर, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी शर्मा यांच्या हस्ते उद्योग प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले, जिल्हा निर्यातीत उत्कृष्ट कामगिरी बजावू शकतो. या पार्श्वभूमीवर निर्यातदार, उद्योजकांनी त्यांना येणाऱ्या अडचणी, सूचना प्रशासनास कळवाव्यात. त्यांचा जिल्ह्याच्या कृती आराखड्यात समावेश करण्यात येईल तसेच निर्यातदार, औद्योगिक संघटनांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान द्यावे, असेही त्यांनी सांगितले. महाव्यवस्थापक सांगळे यांनी जिल्ह्याच्या निर्यात कृती आराखड्याबाबत माहिती दिली. त्यासाठी निर्यातदार व औद्योगिक संघटनांनी सूचना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले. सहाय्यक आयुक्त भामरे यांनी केंद्र, वस्तू व सेवाकर कायदा, केंद्रीय उत्पादन शुल्क करविषयक शासनाच्या योजना व सवलतींबाबत मार्गदर्शन केले. देवरे यांनी निर्यातीसाठीचे विविध टप्पे व प्रक्रिया, स्टेट बँक ऑफ इंडियाचे युगेश सामंत यांनी निर्यातीसाठी बँकेच्या विविध योजना, प्रा. तुषार पाटील यांनी वस्त्रोद्योग उत्पादनांसाठीच्या विविध संधी याविषयी, तसेच धुपेस्कर, उद्योग उपसंचालक इंगळे यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक सुभाष गिरासे, उद्योग निरीक्षक एस. टी. लासूरकर, एस. बी. ओझरकर, एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी नवीन खंडारे, मिटकॉनचे प्रकल्प अधिकारी पी. टी. महाजन यांनी या संमेलनाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले. उपसंचालक इंगळे यांनी प्रास्ताविक केले. उद्योग निरीक्षक एन. पी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.