शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना’ने महानगरातील वर्दळ थांबवली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:36 IST

शासनाच्या आदेशानुसार, राज्यात बुधवारी (दि. १४) रात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे़ तरीही रस्त्यांवर नागरिक बिनधास्तपणे फिरताना आढळून ...

शासनाच्या आदेशानुसार, राज्यात बुधवारी (दि. १४) रात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे़ तरीही रस्त्यांवर नागरिक बिनधास्तपणे फिरताना आढळून आले़ मुख्य बाजारपेठ सोडली तर कॉलनी परिसरात आणि दाट वस्तीच्या गल्ल्यांतही सर्व काही सुरू असल्याचे दिसून आले़

लॉकडाऊनचा फायदाच काय?

कोरोनाच्या अनुषंगाने संपूर्ण राज्यामध्ये लॉकडाऊन करण्यात आलेले आहे़ यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणालाही विनाकारण फिरता येणार नाही़ त्यांच्यावर निर्बंध लावत सर्वत्र संचारबंदी लावण्यात आली आहे़ त्याची अंमलबजावणी धुळ्यात होत आहे़; पण अपेक्षित प्रमाणावर त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे पुन्हा पुन्हा समोर येत आहे़ संचारबंदी लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी आग्रा रोडवर सामसूम आढळून आली़; पण, त्याच्यापुढे असलेल्या पाचकंदिल चौकात विक्रेत्यांसह नागरिकांची वर्दळ दिसून आली़

विनाकारण शहरात वावर

शहरात संचारबंदी लावूनही विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे वर्दळीवरून समोर येत आहे़ कोरोनाच्या अनुषंगाने लॉकडाऊन असतानाही बिनधास्तपणे फिरणाऱ्यांची संख्या काही कमी होताना दिसत नाही़ पोलीसही ठरावीक ठिकाणी आणि ठरावीक वेळेतच दिसत असल्याने बहुधा त्याचा फायदा अनेकांकडून घेतला जात असल्याचे स्पष्ट आहे़ विविध ठिकाणी गर्दी दिसून येते़ त्यावर नियंत्रण मिळविण्याची गरज आहे़

आग्रा रोडवर सामसूम

शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोडवर बहुतांश व्यापाऱ्यांनी संचारबंदीच्या आदेशाचे पालन करीत आपापली दुकाने बंद ठेवल्याने आग्रा रोडवर सामसूम पाहायला मिळाली़ तरीही आग्रा रोड, पारोळा रोडच्या क्रॉसिंगवर थांबून शहरात विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी जाब विचारला़

... अन्यथा, गुन्हे नोंदविण्याचा इशारा

शहरातील संतोषी माता चौक, कराचीवाला खुंट, गांधी पुतळा, पारोळा रोड, साक्री रोड, फाशी पूल, रेल्वे स्टेशन परिसर, बारापत्थर आदी भागांत पोलिसांच्या गस्ती पथकाद्वारे विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना रोखण्यासाठी प्रयत्न झाले. विनाकारण घराबाहेर पडल्यास नाइलाजाने कारवाई करावी लागेल, अशी समज देत नागरिकांना सोडण्यात आले असले तरी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई तसेच गुन्हा नोंद होऊ शकतो, याची जाणीव त्यांना करून देण्यात येत होती़