शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

मलेरिया झाल्यास वेळेवर औषधोपचार करा : हिवताप अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:38 IST

हिवताप हा कीटकजन्य आजार असून अनेक आजारांपैकी एक गंभीर व मानवाचा जीवघेणा आजार आहे. हिवताप हा प्लाझमोडियम या एकपेशीय ...

हिवताप हा कीटकजन्य आजार असून अनेक आजारांपैकी एक गंभीर व मानवाचा जीवघेणा आजार आहे. हिवताप हा प्लाझमोडियम या एकपेशीय परोपजीवी रोगजंतूपासून होतो.

कुठल्याही तापाकडे दुर्लक्ष करू नका. हा ताप मलेरिया असू शकतो. मलेरिया घातक ठरू शकतो. औषध विक्रेत्याच्या अथवा स्वत:च्या अल्प ज्ञानावर तापाकरिता परस्पर औषधे घेऊ नका. त्यासाठी नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात, महानगरपालिकेच्या दवाखान्यात किंवा रुग्णालयात मलेरियासाठी सोपी व सुलभ रक्त तपासणी करून घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने पूर्ण औषधोपचाराचा डोस घ्या. योग्य वेळी समूळ औषधोपचार केल्याने मलेरियाचा रुग्ण खात्रीने व हमखास बरा होतो.

मलेरिया पसरविणारे डास आपण साठविलेल्या स्वच्छ पाण्यात आढळतात. पाण्याच्या टाक्यात डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून त्या दुरुस्त करणे, त्यास झाकण बसविणे व गळती थांबविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. दैनंदिन वापराच्या पाण्याकरिता घरामधील तसेच घराबाहेरील पिंपे आठवड्यातून दोनदा पूर्णपणे रिकामी व स्वच्छ करून पुन्हा भरणे व ती झाकून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. डासांचा उपद्रव पूर्णपणे टाळण्यासाठी पाण्याच्या सर्व टाक्या तसेच पिंपे इत्यादी साठे डास प्रतिबंध स्थितीत आणि व्यवस्थित झाकून ठेवा. इमारतीच्या गच्चीवर आणि परिसरात अनावश्यक पाणी साचू देऊ नका. परिसरातील घराजवळील पाण्याची डबकी वेळीच बुजवा किंवा वाहती करावीत.

वैयक्तिक सुरक्षिततेसाठी झोपताना विशेषत: कीटकनाशक भारित मच्छरदाणीचा वापर करावा. डास प्रतिबंधक यंत्रे, मलम, अगरबत्ती वापरावी. घराच्या खिडक्यांना बारीक जाळीचे पडदे लावावेत. तसेच डेंग्यू तापाची लागण झाल्यास घाबरून जाऊ नये. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्ताची तपासणी करावी व औषधोपचार घ्यावा, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांनी केले आहे.