शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वीज कनेक्शन कट केल्याच्या रागातून लाईनमनला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 23:03 IST

दोघांवर शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा

शिरपूर : वीज बिल थकबाकीमुळे वीज कनेक्शन खंडीत करण्यासाठी गेलेल्या लाईनमनला शिरपूर शहरात मारहाण झाल्याची घटना घडलेली आहे. या प्रकरणी दोघांवर शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

शिरपूर शहरात शुक्रवारी वीज वितरण कंपनीचे कर्मचारी युवराज विनायक सोनवणे, प्रेमसिंग पंडित बंजारा व किसन दुधा पावरा हे शहरातील आदर्श नगर भागात वीज बिल वसुली साठी गेले होते. यावेळी त्यांना त्यांचे अधिकारी हितेंद्र बढे यांनी वीज बिल थकबाकी वसूल करून आणावी. तसेच जे वीज बिल भरणार नाहीत त्यांची वीज खंडित करावी असे त्यांना आदेश दिलेले होते. यावरून त्यांनी शहरातील वीज बिल वसुली करण्यासाठी ते आदर्श नगर येथे गेले होते. ज्यांनी विज बिल भरले नाही त्यांचे वीज कनेक्शन कर्मचारी खंडित करत होते.

शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या दरम्यान विठू वजीर लोहार यांचे नातू इरफान फारुख लोहार व जाबीद फारूख लोहार हे तेथे आले. त्यांनी सोनवणे यांना जाब विचारला. यावेळी सोनवणे यांनी आम्हाला कार्यालयातून वीज वसुली करण्याचे आदेश आहेत. तसेच आपल्याकडे असणारे ११०७० रुपये वीजबील आपण भरणा केलेला नाही. म्हणून तुमचे वीज कनेक्शन खंडित करण्यात आलेले आहे. असे सांगून ते पुढे जावू लागले. मात्र याच वेळी इरफान व जाबीद यांनी सोनवणे यांना आडवे झाले. त्यांनी सोनवणे यांना वाईट वाईट शिवीगाळ करीत त्यांची कॉलर पकडून धक्काबुक्की करीत मारहाण केली. यावेळी सोनवणे यांना त्यांचे सोबत आलेले बंजारा व पावरा यांनी दोघांच्या तावडीतून सोडवले.

याप्रकरणी युवराज विनायक सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आदर्श नगर येथे राहणारे इरफान फारूख लोहार व जाबीद फारुख लोहार यांच्या विरोधात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३५३, ३२३, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे़